मुंबई : अनेक वेळा कठोर परिश्रम करुन देखील लोकांना त्यांच्या आयुष्यात हवी तशी प्रगती होत नाही. एवढंच काय तर मेहनत करुन देखील लोकांना अनेकदा संघर्षाला सामोरं जावे लागते आणि त्यांनी काहीही केलं तरी, त्याचा उलट परिणाम होतो. असे म्हटले जाते की, यामागे असे अनेक दोष असू शकतात, ज्याबद्दल पीडित व्यक्तीला अजिबात माहिती नसते. हे सर्व त्याच्यासोबत का होत आहे हे त्याला समजत नाही. असे सांगितले जाते की, दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले आहेत. ज्याचा अवलंब करुन तुम्ही दोष दूर करु शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष शास्त्रात वेगवेगळ्या समस्यांचे वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत. यामध्ये साखरेशी संबंधित देखील काही उपाय सांगितले गेले आहे. ज्यामुळे लोकांना त्यांच्या करिअरमध्ये फायदा होईल. करिअर व्यतिरिक्त साखरेशी संबंधित ज्योतिषीय उपाय देखील घरात आनंदी वातावरण निर्माण करू शकतात.


साखरेशी संबंधित कोणते उपाय तुम्ही अवलंबू शकता हे जाणून घ्या.


ग्रह दोष दूर करा


असे मानले जाते की, साखरेसाठी ज्योतिषीय उपायांचा अवलंब करून ग्रह दोष दूर होतात. यासाठी तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करावे लागेल. हा उपाय करण्यासाठी एका कलशात स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात साखरेचे काही दाणे टाका. आता हे पाणी सकाळी लवकर सूर्यदेवाला अर्पण करा. या उपायाचा अवलंब केल्याने सूर्यदेव लवकर प्रसन्न होतात आणि ग्रह दोष दूर होतात.


व्यवसायात नफा मिळवण्यासाठी


जर एखाद्याला त्याच्या व्यवसायात अडथळे येत असतील आणि धनहानी होत असेल, तर त्यावर साखरेचा उपाय करू शकता. अशा व्यक्तीने साखरेच्या पाण्याचे द्रावण नियमित घ्यावे. तांब्याचे भांडे घेऊन त्यात थोडी साखर टाकून रात्रभर ठेवा आणि सकाळी ते प्या. तसेच, जर तुम्ही एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर जात असाल तर यावेळी हे पाणी जरूर प्या. यातून यश मिळू शकते, तसेच पॉझिटीव्हिटी त्या व्यक्तीला मिळते.


असे म्हटले जाते की, जर घरात पितृ दोष असेल, तर यामुळे केवळ आर्थिकच नाही तर शारीरिक समस्याही तुम्हाला घेरू शकतात. पितृदोषामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये अनेकदा मतभेद होतात. 
अशावेळी देखील साखरेशी संबंधित उपाय प्रभावी ठरू शकतात.


हा उपाय करण्यासाठी पिठाची चपाती करुन त्यात साखर मिसळून कावळ्यांना खाऊ घाला. असे म्हणतात की, असे केल्याने घरातील वाद कमी होतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा उपाय अनेक दिवस करणे चांगले मानले जाते.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)