Navpancham Rajyog 2024: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या गोचरमुळे अनेक राजयोग तयार होतात. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचर एका विशिष्ट कालावधीत होऊन अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच आता गुरु, सूर्य आणि मंगळ दुहेरी नवपंचम योग तयार करत आहेत. हे संयोजन सुमारे 50 वर्षांनी होणार आहे. या राजयोगामुळे राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. यावेळी काही राशींना आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.


मेष रास (Aries Zodiac)


दुहेरी नवपंचम राजयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमचा सन्मान होईल. पालकांना त्यांच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्ही देश-विदेशात पर्यटनासाठी जाऊ शकता. हा योग बनल्याने मुलांसह प्रेमसंबंधांच्या क्षेत्रात बरेच फायदे होणार आहेत.


मिथुन रास (Mithun Zodiac)


दुहेरी नवपंचम राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुमचं उत्पन्न वाढणार आहे. तसंच तुमचं काम किंवा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होणार आहे. विवाहित लोकांना वैवाहिक जीवनात काही समस्या येऊ शकतात. 


कर्क रास (Cancer Zodiac)


दुहेरी नवपंचम राजयोग तुमच्यासाठी अद्भूत ठरू शकतो. यावेळी तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय मिळू शकणार आहे. नोकरी आणि व्यवसायातही यश मिळेल. नोकरदार लोकांना त्यांच्या इच्छित ठिकाणी बढती आणि बदली मिळू शकते. समाजात मान-प्रतिष्ठेच्या मागणीत वाढ होऊ शकते. व्यावसायिकांनाही यावेळी चांगला आर्थिक लाभ होईल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )