Samsaptak Rajyog / Shani Shukra Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आपल्या विशिष्ट ठराविक वेळेनंतर आपली जागा बदलतो. ज्योतिषशास्त्रात ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्याला गोचर किंवा संक्रमण असं म्हटलं जातं. चंद्र हा सर्वात जलद गतीने तर शनिदेव सर्वात संथ गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ग्रह गोचरमुळे राशींमध्ये अनेक योग तयार होत असतात. यातील काही योग अशुभ तर काही शुभ असतात.  लवकरच शनि - शुक्र आणि गुरू - राहू समोरासमोर येणार असल्याने तब्बल 94 वर्षांनंतर 'दुहेरी समसप्तक राजयोग' तयार होतो आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात समसप्तक राजयोग हा अतिशय शुभ मानला जातो. या राजयोगामुळे काही राशींचे अच्छे दिन येणार आहे. 18 ऑक्टोबरला असणारा दुहेरी समसप्तक राजयोग काही राशींवर धनवर्षावर होणार आहे. (Double Samasaptak Rajayoga due to Saturn Venus conjunction after 94 years Money will be showered Shani on these zodiac signs)


'या' राशी ठरणार भाग्यवान 


वृषभ (Taurus Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


'दुहेरी समसप्तक राजयोग' या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळं मिळणार आहे. त्याची आर्थिक स्थिती मजबूत होणार असून पैशांची समस्या दूर होणार आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक बातमीसोबत प्रगतीचे मार्ग खुले होणार आहेत. तुमचा समाजात मान सन्मान वाढणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. 


तूळ (Libra Zodiac)


या राशीतील लोकांना 'दुहेरी समसप्तक राजयोग' नशिबवान ठरणार आहे. या लोकांना अचानक धनलाभ होणार आहे. त्याचे अडकलेले पैसा त्यांच्याकडे परत येणार आहे. तुम्ही मालमत्ता किंवा गाडी खरेदी करु शकता. आर्थिक स्थिती मजूबत होणार आहे. यश आणि प्रगतीचे मार्ग खुले होणार आहे. जोडीदाराच्या मदतीने तुम्हाला फायदा होणार आहे. व्यवसायिकांसाठीही हा योग भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना मोठा सौद्यातून फायदा होणार आहे. 


धनु (Sagittarius Zodiac)


'दुहेरी समसप्तक राजयोग' धनु राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे. या लोकांना लॉटरी लागणार आहे. नशिबाची साथ काय असते हे या लोकांना कळणार आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रुची वाढणार आहे. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळणार आहे. जुन्या आजार नाहीसा होणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)