Shukra Gochar 2024: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी एका महिन्यात काही ग्रह दोन वेळा देखील राशी बदलतात. असंच शुक्र ग्रह जुलै महिन्यात एकदा नाही तर दोनदा भ्रमण करणार आहेत. शुक्राचे पहिलं गोचर 7 जुलै 2024 रोजी कर्क राशीत होणार आहे. तर 31 जुलै 2024 रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी शुक्राच्या गोचरमुळे काही राशींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. या काळात शुक्र देखील लक्ष्मी नारायण योग तयार करणार आहे. दरम्यान शुक्राच्या या गोचरमुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे ते पाहुयात.


मेष रास


शुक्राचे दोन्ही संक्रमण तुमच्यासाठी शुभ परिणाम देणार आहे. यामुळे जुलैमध्ये आम्हाला भरपूर नफा मिळणार आहे. व्यवसायात लाभ होणार आहे. करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकणार आहेत. वडिलधाऱ्यांचा पूर्ण आशीर्वाद मिळणार आहे. व्यावसायिक जीवनात अपेक्षित यश मिळू शकणार आहे. समाजात प्रतिष्ठा वाढेल. वैवाहिक सुख मिळेल.


वृश्चिक रास


हा काळ तुमच्यासाठी यशाची नवीन दारे उघडणार आहे. या काळात तुमची संपत्ती वाढू शकणार आहे. तुमचा आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या वडिलांचे सहकार्य मिळेल. 


कर्क रास


शुक्राच्या दुहेरी गोचरमुळे जीवनात सुखसोयी वाढणार आहे. यावेळी घरात पैशाची आवक वाढण्याची शक्यता आहे. तुमचे करिअर आणि व्यवसाय चांगला होणार आहे. तुम्हाला अचानक कुठूनतरी अनपेक्षित पैसे मिळू शकतील. व्यावसायिकांना व्यवसायात नफा मिळेल आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. नोकरदार लोकांसाठी पदोन्नती आणि वेतनवाढीची शक्यता आहे.


तूळ रास


हे दोन्ही गोचर तुमच्यासाठी खूप शुभ आहेत. तुम्हाला अनपेक्षित पैसा तर मिळेलच पण यशही मिळेल. प्रगतीच्या सुवर्ण संधी मिळतील. ऑफिसमध्ये मान-सन्मान मिळेल. तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत कुठेतरी फिरू शकता. नोकरदार लोकांसाठी पदोन्नती आणि वेतनवाढीची शक्यता आहे.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)