मुंबई : प्रत्येकाला झोपेत स्वप्न पडतात. काही स्वप्न पूर्ण व्हावीत अशी आपली इच्छा असते. आपण ज्या गोष्टीचा सतत विचार करत असतो.  तिचं गोष्ट, घटना किंवा एखादा व्यक्ती आपल्या स्वप्नात येतो. असं देखील म्हणतात की पहाटे पडलेले स्वप्न कायम पूर्ण होतात. स्वप्न शास्त्रात याचे वर्णन केले आहे. आज आपण अशाच काही स्वप्नांबद्दल जाणून घेणार आहोत जे सहसा बहुतेक लोकांना येतात. ही स्वप्ने शुभ असतात की अशुभ जाणून घेवू...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वप्नांचे शुभ-अशुभ संकेत
- स्वप्नात तुम्ही पूजा होताना पाहात असाल, तर कोणत्याही योजनेचा तुम्हाला लाभ होवू शकतो.
- स्वप्नात गाईचं वासरू दिसत असेल, तर चांगली बातमी मिळेल. 
- स्वप्नात वसंत ऋतू दिसला, रंगीबेरंगी फुले दिसली तर ते भाग्य वाढण्याचे लक्षण आहे.
- स्वप्नात तुम्ही स्वतःचा मृत्यू पाहात असाल तर, गंभीर आजारातून तुमची सुटका होणार असं सांगितलं जातं.
- स्वप्नात तुम्हाला पोपट दिसला, तर तुम्हाला अचानक धनलाभ होवू शकतो.
- स्वप्नात दूध दिसत आसेल, तर ते स्वप्न सुख-समृद्धी वाढवेल असं सांगितलं जातं.


(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)