Dussehra 2024 (Vijayadashami) : दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा असा हा सण आहे. दसऱ्या म्हणजे विजयादशमीला आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना देण्यात येतात. दसरा सण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक दसऱ्याचा सण आहे. आश्विन शुक्ल दशमीला दसरा हा सण साजरा करण्यात येतो. शमीची पूजा, अपराजिता देवी पूजा, त्यासह सरस्वती, लक्ष्मी आणि शस्त्र पूजा करण्यात येणार आहे. दसऱ्याला पूजा कशी करायची, शुभ मुहूर्त काय, महत्त्व जाणून घ्या. (dussehra 2024 vijayadashami Dasara tithi shastra pujan shubh muhurat shubh yog and gold shopping)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिवशी शुभ कार्य, गृह प्रवेश, वाहन खरेदी आणि सोनं खरेदी करण्यात येते. दसऱ्याला सोने खरेदी शुभ मानली जाते. 


दसरा तिथी (Dussehra 2024 Tithi)


पंचांगानुसार आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी 12 ऑक्टोबरला सकाळी 10.55 वाजेपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 ऑक्टोबरला सकाळी 09:07 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 12 ऑक्टोबर शनिवारी दसरा सण साजरा केला जाणार आहे. कारण रावण दहन प्रदोष काळात केलं जातं. 


 


हेसुद्धा वाचा - Vijayadashami 2024 : विजयादशमी हा सण का साजरा करण्यात येतो? सीमोल्लंघन म्हणजे नेमकं काय?


 


दसरा 2024 पूजा शुभ मुहूर्त 


दसऱ्याला रवि आणि सर्वार्थ सिद्धी योग असून हा अतिशय शुभ योग मानला जातो. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 01:16 पासून 03:35 पर्यंत असणार आहे. याशिवाय सकाळी 11:50 ते दुपारी 12:36 ही वेळही शस्त्रपूजनासाठी शुभ आहे. अमृतकाल दरम्यान, दुपारी 3:06 ते 4:33 या वेळेतही शस्त्रपूजा करता येते. 


 


हेसुद्धा  वाचा - Dasara 2024 : दसऱ्याला 'सोनं' म्हणून आपट्याची पानंच का लुटतात? धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या


 


दसऱ्याला शस्त्र पूजा का करतात?


षोडश मातृकामध्ये सहाव्या क्रमात जी देवी येते तिचं नाव विजया आहे. जगतजननी मत भवानीच्या दोन सखींचे (मैत्रिणी) नाव जया-विजया आहे. यामधील एकीच्या नावावर विजयादशमीचा सण साजरा केला जातो. हा सण शस्त्राने देशाच्या सीमेची रक्षा करणारे तसेच कायद्याचे रक्षण करणारे किंवा शस्त्राचा इतर चांगल्या कामासाठी वापर करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.


या दिवशी हे सर्वजण आपापल्या शस्त्रांची पूजा करतात, कारण हे शस्त्र प्राणांची रक्षा करतात तसेच भरण पोषणाचे साधनही आहेत. या अस्त्रांमध्ये विजय देवीचा वास मानून यांची पूजा केली जाते. सर्वात पहिले शस्त्रांवर पाणी शिंपडून पवित्र केले जाते त्यानंतर महाकाली स्तोत्राचे पाठ करून शस्त्रांवर हळद, कुंकू, फुल अर्पण करून धूप-दीप दाखवून पूजा केली जाते.


 


हेसुद्धा वाचा - Dussehra 2024 : यंदा विजयादशमीला अशुभ संकेत; चुकूनही करू नका 'हे' काम


 


दसरा पूजा पारंपरिक विधी 


एका पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचा कपडा परिधान करा. बाजूला छान रांगोळी काढा. त्यानंतर एका पाटीवर किंवा कागदावर सरस्वती पूजनासाठी सरस्वती यंत्र काढा. लक्ष्मी देवीचा फोटा किंवा मूर्ती आणि कलश स्थापना करा. गपणपती म्हणून सुपारी ठेवा. त्यासोबत देवांचे पुस्तकसह अभ्यासाची वही पुस्तक आणि पेनसोबत शस्त्र म्हणून कात्री, पाना, पिनचिस वैगेरे ठेवा. त्यांची हळदकुंकू वाहून पुजा करा. त्यानंतर आपट्याचा पानांची पूजा करा. पाच फळं ठेवा. आता आपट्याची पानं अर्पण करा. देवा आणि अगबत्ती लावून नमस्कार करा. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)