Earthquake in Delhi : काल वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण पाहयला मिळाले. दरम्यान, या चंद्रग्रहणानंतर मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी लोक घाबरले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये (Nepal) होता, ज्याची तीव्रता 6.3 रिस्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा परिणाम संपूर्ण उत्तर भारतावर दिसून आला. दिल्ली-एनसीआर ( Delhi NCR ) आणि लखनऊमध्येही जमिनीला जोरदार हादरे बसले. घरात झोपलेल्या लोकांचे पलंग थरथरु लागले तर पंखे हळू लागले होते. भीतीने लोक घराबाहेर पडलेत. त्यामुळे एकच गोंधळाची परिस्थिती रस्त्यावर दिसून येत होती. पण भूकंप, चक्रीवादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा ग्रहणांशी काही संबंध आहे का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रग्रहणाचा थेट संबंध भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीशी असतो ( Lunar Eclipse and Eathquake ), असे ज्योतिषांच्या मते सांगितले जाते. ग्रहण हे ज्योतिषशास्त्रात अशुभ आणि घातक परिणाम करणारे मानले जाते. 31 जानेवारी 2018 रोजी चंद्रग्रहण होण्यापूर्वी दिल्ली-एनसीआर, पाकिस्तान आणि कझाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 richter scale इतकी होती. आजही तेच झाले. चंद्रग्रहण पूर्ण झाल्यानंतर काही तासांतच पृथ्वी हादरण्याची प्रक्रिया सुरु झाली. प्राचीन गणितज्ज्ञ वराह मिहीर यांच्या बृहत संहितेनुसार भूकंप होण्यामागे काही कारणे आहेत, ज्याचे संकेत मिळतात. यापैकी एक म्हणजे ग्रहण योग.


ग्रहण कधी होते


जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. जेव्हाही ग्रहण होते किंवा येणार आहे, त्यावेळी ते 40 दिवस आधी किंवा 40 दिवसानंतर भूकंपाचे होतो.  म्हणजे 80 दिवसांच्या मध्यात कधीही भूकंप येऊ शकतो. कधीकधी हा कालावधी आणखी कमी असतो आणि 15 दिवस आधी किंवा 15 दिवसांनी भूकंप होतो. टेक्नोटिक प्लेट्सच्या टक्करमुळे भूकंप होतात आणि मग त्यातून त्सुनामीचा जन्म होतो, असे विज्ञान सांगते. तर ज्योतिषशास्त्रानुसार टेक्टोनिक प्लेट्स ग्रहांच्या प्रभावाने हलतात आणि एकमेकांवर आदळतात. त्यातून कंपने तयार होऊन भूकंप होतो. भूकंपाची तीव्रता प्लेट्सवरील ग्रहांच्या प्रभावावर अवलंबून असते, असे सांगितले जाते. 


दिल्ली, लखनऊमध्ये भूकंपाचे धक्के; तिघांचा मृत्यू


धार्मिक आधारावर चंद्रग्रहणाचा परिणाम पाणी आणि समुद्रावर होतो. ग्रहण आधीच येणार्‍या नैसर्गिक आपत्तीबद्दल सूचित करते. यावर अनेकांचा विश्वास असला तरी काहींचा त्यावर नसतो. साधारणपणे, दिवसाचे 12 वाजेपर्यंत सूर्यास्त होईपर्यंत आणि मध्यरात्री सूर्योदय होईपर्यंत भूकंप होतो. ज्योतिषशास्त्रानुसार, त्या भागात भूकंप होण्याची शक्यता जास्त असते, जिथे ग्रहणाचा प्रभाव स्पष्ट असतो आणि जिथे पृथ्वीच्या खाली परिस्थिती विपरीत असते. भूकंप पृथ्वीच्या विशेष प्लेट्सजवळच होतात. ग्रहणात ग्रह एकमेकांवर सावल्या पडतात. ही सावली चंद्रावर पडते किंवा पृथ्वीवर, दोन्हीवर त्याचा परिणाम होतो. याशिवाय, जेव्हा सूर्याची किरणे कोणत्याही विशिष्ट कारणाने पृथ्वीवर पडत नाहीत, तेव्हा चंद्र आणि पृथ्वी दोन्ही प्रभावित होतात. 


हे परिणाम दिसून येतात


ग्रहणानंतर वाऱ्याचा वेग बदलतो. त्यानंतर पृथ्वीवर गडगडाट आणि वादळांचा प्रभाव वाढतो. ज्योतिषांच्या मते, ग्रहणाच्यावेळी जेव्हा पृथ्वी आणि चंद्र सूर्याच्या पुढील दिशेने एका सरळ रेषेत येतात, तेव्हा भूगर्भीय हालचालींची शक्यता वाढते. ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला खूप महत्त्व आहे. कारण त्याचा परिणाम लोकांच्या जीवनावर होत असतो. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ येतो तेव्हा गुरुत्वाकर्षणाचा सर्वात जास्त परिणाम होतो. या कारणास्तव, पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात सर्वाधिक भरती येतात आणि ग्रहणाचा प्रभाव आणखी वाढतो. गुरुत्वाकर्षणाच्या वाढीमुळे आणि कमी झाल्यामुळे भूकंप होतात. 



(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)