Friday Panchang : आज महानवमीसह सुकर्म योग! कन्या पूजेचा शुभ मुहूर्त जाणून घ्या
11 October 2024 Panchang : आज आश्विन शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Panchang 11 October 2024 in marathi : आज नवरात्रीची शेवटची नवमी माळ आहे. याला महानवमी असं म्हणतात. महानवमीच्या दिवशी सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाते. या दिवशी भक्त माता सिद्धिदात्रीच्या पूजेबरोबरच कन्या पूजन किंवा अन्नदान करतात. असं केल्यानं माता दुर्गेची कृपा भक्तांवर कायम राहतं. आईला आदिशक्ती भगवती असेही म्हणतात. सिद्धिदात्री मातेची यथायोग्य पूजा केल्याने भक्तांना यश आणि मोक्ष प्राप्त होतो, असा विश्वास आहे.
महानवमी कन्या पूजन शुभ मुहूर्त
नवमी तिथीला कन्या पूजेचा शुभ मुहूर्त 2 ते 2.45 पर्यंत सुरू होईल. याशिवाय सकाळी 11.45 ते 12.30 असा शुभ मुहूर्त असेल. या शुभ मुहूर्तावर कन्यापूजाही करता येते.
आज पंचांगानुसार (Panchang Today) आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. पंचांगानुसार सुकर्म योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि उत्तराषाद नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र मकर राशीत आहे. (friday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. अशा या शुक्रवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (friday panchang 11 october 2024 panchang in marathi Maa Siddhidatri Maha Navami Kanya Pujan Navratri 2024)
पंचांग खास मराठीत! (11 october 2024 panchang marathi)
वार - शुक्रवार
तिथी - अष्टमी - 12:08:52 पर्यंत
नक्षत्र - उत्तराषाढ़ा - 29:25:58 पर्यंत
करण - भाव - 12:08:52 पर्यंत, बालव - 23:40:10 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - सुकर्मा - 26:45:47 पर्यंत
सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - 06:19:47
सूर्यास्त -17:55:15
चंद्र रास - धनु - 11:41:54 पर्यंत
चंद्रोदय - 13:54:59
चंद्रास्त - 24:17:00
ऋतु - शरद
हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:35:28
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - आश्विन
आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त - 08:38:52 पासुन 09:25:14 पर्यंत, 12:30:41 पासुन 13:17:03 पर्यंत
कुलिक – 08:38:52 पासुन 09:25:14 पर्यंत
कंटक – 13:17:03 पासुन 14:03:25 पर्यंत
राहु काळ – 10:40:34 पासुन 12:07:30 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 14:49:47 पासुन 15:36:09 पर्यंत
यमघण्ट – 16:22:31 पासुन 17:08:53 पर्यंत
यमगण्ड – 15:01:22 पासुन 16:28:18 पर्यंत
गुलिक काळ – 07:46:43 पासुन 09:13:38 पर्यंत
शुभ मुहूर्त
अभिजीत - 11:44:20 पासुन 12:30:41 पर्यंत
दिशा शूळ
पश्चिम
ताराबल आणि चंद्रबल
ताराबल
भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती
चंद्रबल
मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)