Guru Chandra Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांचं विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह हा ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. जर अशावेळी कुंडलीतील त्या स्थानात पहिलेच कुठला ग्रह असेल आणि दुसऱ्या ग्रहाची त्या घरात एन्ट्री झाली तर या युतीमुळे अनेक योग तयार होत असतात. काही योग हे अतिशय शुभ असतात जे लोकांना राजासारखं आयुष्य प्रदान करतं. तर काही  योग हे अतिशय अशुभ असतात जसे की विष योग. हा माणसाच्या आयुष्यात भूकंप आणतो. 


बृहस्पति-चंद्र युती 2023 (Brihaspati Chandra Yuti 2023)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवार 24 मे 2023 हा दिवस ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने अतिशय खास आहे. कारण यादिवशी गुरु आणि चंद्राची युती होणार आहे. गुरु आणि चंद्राच्या या भेटीमुळे दोन शुभ योग तयार होत आहेत. गजकेसरी आणि महालक्ष्मी राजयोग यामुळे काही राशींच्या लोकांवर धनवर्षाव होणार आहे. (gajakesari mahalaxmi rajyog guru chandra gochar will be formed on may 24 luck 3 zodiac shine wealth success)


मेष (Aries)


या राशीच्या लोकांसाठी हे राजयोग अतिशय शुभ ठरणार आहे. गुरु मेष राशीत असल्याने या लोकांना जबरदस्त धनलाभ होणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होणार आहे. अनेक दिवसांपासून न होणारे कामं सहज मार्गी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहे. नोकरदारा वर्गासाठी हा राजयोग शुभ ठरणार असून त्यांना आर्थिक फायदा होणार आहे. 


मिथुन (Gemini)


या राशीच्या लोकांची या दोन राजयोगामुळे चांदीच चांदी होणार आहे. या लोकांना अचानक पैशांच पैसा मिळणार आहे. तुमच्या प्रभावाखाली आजूबाजूचे लोक येणार आहेत. आर्थिक प्रगती सोबत पैसे कमविण्याचे अनेक मार्ग सापडणार आहेत. मार्केटिंग किंवा सेल्सशी लोकांसाठी हा भाग्यशाली काळ ठरणार आहे. 


तूळ (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग अतिशय शुभ ठरणार आहे. कारण तूळ राशीच्या दहाव्या घरात चंद्र तर सातव्या घरात गुरु आहे. त्यामुळे आर्थिक फायद्यासह प्रगतीचे उंच शिखर तुम्ही गाठणार आहात. घरात सुख समृद्धी नांदणार आहे. तुमच्या जोडीदाराचीही या दिवसामध्ये प्रगती होणार आहे. घरामध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)