Gajlaxmi Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यापैकी काही ग्रह मार्गस्थ आणि वक्री होतात. ज्यावेळी ग्रह मार्गी व वक्री होतात त्यावेळी अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण करणार आहेत. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

31 डिसेंबर रोजी गुरु वक्री स्थितीतून मार्गस्थ होणार आहे. दरम्यान गुरुच्या मार्गस्थ स्थितीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. अशा परिस्थितीत या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. यावेळी अशा 3 राशी आहेत ज्यांना 2024 मध्ये आर्थिक लाभ होणार आहे. जाणून घेऊया गजलक्ष्मी राजयोगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होणार आहे. 


कर्क रास (Cancer Zodiac)


गजलक्ष्मी राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. गुरु हा ग्रह तुमच्या राशीतून कर्माकडे वाटचाल करणार आहे. व्यावसायिकांना या काळात व्यवसायात चांगला नफा मिळू शकणार आहे. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ खूप शुभ परिणाम देणारा आहे. यावेळी तुम्हाला प्रत्येक कामात तुमच्या वडिलांचे सहकार्य मिळेल.


सिंह रास (Leo Zodiac)


गजलक्ष्मी राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकणार आहे. यावेळी धार्मिक कार्यात तुमची रुची वाढू शकणार आहे. कुटुंबात काही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकणार आहे. कुटुंबाची परिस्थितीवरही सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. अध्यात्माशी संबंधित असाल, तर हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात.


धनु रास (Dhanu Zodiac)


गजलक्ष्मी राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनातही आनंद मिळू शकतो. यावेळी वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. आर्थिक स्थितीही मजबूत होऊ शकते. भौतिक सुखसोयींमध्येही वाढ होणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळेल. तुम्हाला चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. न्यायालयीन प्रकरणांमध्येही तुम्हाला यश मिळू शकणार आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )