मुंबई : सध्या कोरोनाच्या आणि लॉकडाउनच्या वातावरणामध्ये मनावरती निराशेचे सावट आहे. सर्व स्तरावरती गोष्टी हळूहळू पूर्ववत होत असताना दिसत आहे आणि याच कठीण काळामध्ये 22 तारखेपासून या सगळ्या दुःखांचा शमन करण्यासाठी आपला गणपती बाप्पा येत आहे .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाउनच्या याकाळात गणेश पूजा घरात करत असताना भटजी उपलब्ध होणे थोडे कठीण काम आहे पण रसिक मायबाप प्रेक्षकांच्या या अडचणी वरती झी मराठीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे.


लॉकडाउनच्या या काळात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची पूजा सकाळी आठ वाजता सादर केली जाणार आहे गुरुजी अतुल शास्त्री भगरे  यांच्याकडून .


गणेश पूजेचा हा सविस्तर भाग आपल्याला 22 तारखेपासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत झी मराठीवर  सकाळी आठ वाजता पाहायला मिळणार आहे. याच भागांमध्ये   श्रीगणेश कथा सांगितली जाणार आहे.


महाराष्ट्रातल्या गणेश भक्तांना या वर्षीचा गणेशोत्सव घरात बसून आनंदाने सात्विक वृत्तीने आणि भक्तिभावाने साजरा करता यावा यासाठी झी मराठी ने केलेले या प्रयत्नात नक्की सहभागी व्हा आणि या उत्सवाची शोभा वाढवा झी मराठी वरती सकाळी आठ वाजता वेध भविष्याचा हा कार्यक्रम नक्की बघा .



आता सर्व दुःख अनलॉक होणार.गणपती बाप्पा मोरया