Ganesh Chaturthi 2023 : आज गणेश चतुर्थीला काही राशींवर बाप्पांची कृपा बसरणार आहे.  पंचांगानुसार तब्बल 300 वर्षांनी ब्रम्ह, शुभ आणि शुक्ल योग जुळून आला आहे. त्यात आज मंगळवारी बाप्पाच्या जन्मदिनाचा वार गणेश चतुर्थीचा संयोग तयार झाला आहे. त्यात शश, गजकेसरी, अमला आणि पराक्रम राजयोगही आहे. आज स्वाती आणि विशाखा नक्षत्र आहे. (swati and vishakha nakshatra)  अशामुळे 6 राशींना अपार धन प्राप्त होणार आहे. (Ganesh Chaturthi 2023 auspicious yog Shubh Yog 2023 shash gajkesari amla parakram rajyog 6 zodiac signs get money)


'या' राशी होणार मालामाल!


वृषभ (Taurus Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चतुर्महायोग आणि दुर्मिळ योगायोगामुळे या राशीच्या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. करिअरमध्ये तुम्ही उंच शिखर गाठणार आहात. कार्यक्षेत्रात धनलाभ होणार आहे. तुमचं नशिबात प्रेमाची एन्ट्री होणार आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेले काम मार्गी लागणार आहे. हा योग तुम्हाला अतिशय लाभदायक ठरणार आहे. 


मिथुन (Gemini Zodiac)


चतुर्महायोग आणि दुर्मिळ योगायोग हा मिथुन राशीसाठी शनीदेवाची आधीपासून कृपा आहे. त्यात आता गणेशाची साथ मिळणार आहे. त्यामुळे विवाह जीवनात आनंद परतणार आहे. घरात आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 


कन्या (Virgo Zodiac) 


चतुर्महायोग आणि दुर्मिळ योगायोग हा कन्या राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे. सरकारी कामं असतील तर त्याला वेग मिळणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. तुमचे अडकलेले पैसे बँकेत जमा होणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. तब्येत थोडी नरम गरम असेल पण तुम्ही सभोवताच्या वातावरणामुळे आनंदी असाल. 


वृश्चिक (Scorpio Zodiac)


या राशीच्या लोकांना बाप्पाची विशेष कृपा प्राप्त होणार आहे. मानसिक सुख शांती तुम्हाला लाभणार आहे.  आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडणार आहेत. नवीन कामाची संधी तुम्हाला मिळणार आहे. घरात आनंदी वातावरण असणार आहे. आर्थिक गणित सुधारणार आहे. 


धनु (Sagittarius Zodiac)


चतुर्महायोग आणि दुर्मिळ योगायोग हा धनु राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आङे. तुम्हाला शेअर बाजार किंवा सोने गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. तुमचं बँक बलेन्स वाढणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)