Ganesh Visarjan Mantra 2022: अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन (Ganesh Visarjan 2022) केले जाते. यंदा ९ सप्टेंबर रोजी म्हणजेच आजच लाडक्या बाप्पाचे (ganpati bappa morya) विसर्जन होईल. बाप्पाच्या पूजेबरोबरच या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याचाही नियम आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपांची पूजा केली जाते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. (ganesh visarjan 2022 shubh muhurat date and visarjan mantra vidhi )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी बाप्पाला निरोप देण्यापूर्वी विधिवत गणेशाची पूजा केली जाते. या दिवशी गणपती बाप्पाला (Ganesh Visarjan) पूर्ण विधीपूर्वक निरोप दिला जातो. असे मानले जाते की, या दिवशी गणेश विसर्जनाच्या वेळी मंत्रोच्चार केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतो आणि त्यांना जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद देतो. गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त आणि मंत्र जाणून घेऊया.


गणेश विसर्जनाच्या वेळी या मंत्राचा जप करा-
 
ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥


गणेश विसर्जन 2022 शुभ मुहूर्त


हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला गणेशाचे विसर्जन केले जाते. या दिवशी 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाची सांगता होते. यावेळी चतुर्दशी तिथी, गुरुवार 08 सप्टेंबर 2022 दुपारी 4.30 वाजता सुरू होईल आणि 9 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 01:30 वाजता समाप्त होईल. उदयतिथीच्या आधारे चतुर्दशी तिथी 9 सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल. यावेळी गणेश विसर्जनाला तीन शुभ मुहूर्त सांगितले जात आहेत.


गणेश विसर्जनासाठी सकाळचा मुहूर्त - सकाळी 06:03 ते 10:44 पर्यंत.


गणेश विसर्जनासाठी दुपारचा मुहूर्त - दुपारी 12:18 ते 1:52 पर्यंत.


गणेश विसर्जनासाठी संध्याकाळचा मुहूर्त - सायंकाळी 5 ते 6.31 ही वेळ शुभ आहे.


 


 


 


 


 



(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)