Ganesh Visarjan 2024 : अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप; गणपतीच्या विसर्जन तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Ganesh Visarjan 2024 : दीड दिवस, पाच दिवस आणि गौरी गणपतीचं विसर्जन पार पडतंय. आता बाप्पा काही दिवसच आपल्यासोबत असणार आहे. अनंत चतुर्दशीला गणेश आपल्या गावाला जाणार.
Ganesh Visarjan 2024 Shubh Muhurat And Vidhi at Anant Chaturdashi In Marathi : हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीपासून अनंत चतुर्दशी गणेश घरोघरी आणि मंडळात विराजमान असतो. दीड दिवस, पाच दिवस करण्यात आलं. तर गौरी गणपतीचं मोठ्या थाट्यामाट्यात विसर्जन करण्यात येणार आहे. आता अवघ्ये काही दिवस बाप्पा आपल्यासोबत असणार आहेत. कारण अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशी तिथी कधी आहे. गणेश विसर्जन शुभ मुहूर्त, गणेश विसर्जन पूजा विधी जाणून घ्या.
अनंत चतुर्दशी 2024 कधी आहे?
पंचांगानुसार चतुर्दशी तिथी 16 सप्टेंबरला दुपारी 3.10 वाजेपासून 17 सप्टेंबरला सकाळी 11:44 वाजेपर्यं असणार आहे. उदय तिथीनुसार मंगळवार 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असणार आहे.
गणेश विसर्जनासाठी शुभ चोघडिया मुहूर्त
सकाळचा मुहूर्त (चरा, लाभ, अमृत) - सकाळी 09:09 ते दुपारी 01:45 वाजेपर्यंत
मुहूर्त (शुभ) - दुपारी 03:17 ते संध्याकाळी 04:49 वाजेपर्यंत
संध्याकाळचा मुहूर्त (लाभ) - संध्याकाळी 07:49 ते रात्री 09:18 वाजेपर्यंत
रात्रीचा मुहूर्त (शुभ, अमृत, चार) – 18 सप्टेंबर रात्री 10:46 ते मध्यरात्री 03:10 वाजेपर्यंत
गणपतीचे विसर्जन कसे करावे?
ज्या दिवशी तुम्ही गणपतीला निरोप देणार आहात. त्या दिवशी सकाळी गणपतीची पूजा करण्याबरोबरच विहित पद्धतीने आरती करावी. यानंतर शुभ मुहूर्तावर विसर्जन करावे. यासाठी स्वच्छ नवीन मोठी बस्ती, ड्रम इत्यादीमध्ये शुद्ध पाणी भरावे. यानंतर त्यात थोडं गंगाजल टाका. त्यानंतर, हातात काही फुले घेऊन, गंगा, जमुना जी, सरस्वती, नर्मदा, कावेरी आणि सिंधू नद्यांचे ध्यान करा आणि त्यांना भेट देण्यासाठी आमंत्रित करा. नंतर त्याच पाण्यात फुले टाका. यानंतर हळूहळू मूर्ती पाण्यात बुडवून गणपती बाप्पा पुढच्या वर्षी यावेत अशी प्रार्थना करा आणि मंत्राचा उच्चार करा. यानंतर बाप्पाला डोक्यापर्यंत पाण्यात बुडवावे. यानंतर मूर्ती पाण्यात विरघळल्यावर त्यामध्ये दुर्वा किंवा इतर कोणतीही पवित्र वनस्पती लावता येते.
गणेश विसर्जनाच्या वेळी हा मंत्र म्हणा
ओम गच्छ गच्छ सुश्रेष्ठ, स्वस्थने परमेश्वर
यात्रा ब्रह्मदयो देवाह, तत्र गच्छ हुताशन।
यान्तु देवगणः सर्वे पूजामादया ममकीं
इष्टकमसमृद्ध्यर्थ पुनरागम्नाया च ।
ओम श्री गणेशाय नमः
ओम श्री गणेशाय नमः
ओम श्री गणेशाय नमः
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)