Ganesh Visarjan 2022: भाद्रपदातील शुक्ल चतुर्थीला गणपतीचं आगमन होत आहे. कोविडच्या संकटावर मात केल्यानंतर दोन वर्षांनी या उत्सवाचं खरं रुप सर्वांनाच पाहता आणि अनुभवता येणार आहे. जवळपास पाच, सात आणि दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर गणपती बाप्पा आपला निरोप घेणार आहेत. गणपती येतो तेव्हा जितका उत्साह असतो त्या तुलनेत गणपती विसर्जनाच्या वेळी मात्र मनात होणारी कालवाकालव सर्वांनीच अनुभवली असेल. (Ganeshotsav 2022 why ganpati visarjan happen only after 10 days know the reason)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुद्दा असा, की गणपती जायला निघाला की कहीच्या डोळ्यात पाणी येतं, तर चिमुकल्यांना एकच प्रश्न पडतो, की का बरं हा बाप्पा घरी जातो? तुम्हीही कधी विचार केलाय का, की गणपतीचं विसर्जन 10 दिवसांनंतर का केलं जातं? 


असं म्हटलं जातं, की भाद्रपदातील शुक्ल पक्षात चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. पुराणकथांमध्ये असाही उल्लेख आहे,की गणेश चतुर्थीच्या दिवशीच बाप्पानं महाभारत लेखनास सुरुवात केली होती. 


महर्षी वेद व्यासांनी गणपतीकडे महाभारत लिहिण्याची विनंती केली होती. ज्यावर मी लिहिण्यास सुरुवात केली तर, लेखणी थांबवणार नाही आणि लेखणी थांबली तर मी महाभारत लिहिणं थांबवेन अशी अट गणपतीनं ठेवली. 


देवा मी एक साधारण ऋषी आणि तुम्ही ईष्ठदेवता. त्यामुळं माझ्याकडून श्लोकांमध्ये काही चूक झाल्यास तुम्ही ती सुधारून महाभारत लिहा, अशा पद्धतीनं सुरुवात झाली आणि महाभारत लिहिण्याचं काम 10 दिवसांपर्यंत सुरुच राहिलं होतं. 


Ganesh Chaturthi 2022: घरच्या घरी करा गणपतीची प्रतिष्ठापना, मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा एका क्लिकवर


 


अनंत चतुर्दशीच्या (Anant chaturdashi) दिवशी जेव्हा महाभारत लेखनाचं काम पूर्ण झालं, तेव्हा गणपतीचं शरीर जड भासू लागलं. अजिबातच हालचाल न केल्यामुळं त्यांच्या शरीरावर धूळ- माती जमली होती. तेव्हाच गणरायानं सरस्वती नदीत स्नान करून शरीर स्वच्छ केलं. याच धारणेनं 10 दिवसांच्या षोडशोपचार पूजेनंतर गणपतीचं विसर्जन केलं जातं. 


मनावरील धूळ-मातीही झटकून टाका.... 
गणरायाच्या आगमनानंतरच पर्व 10 दिवस आपल्याला संयम आणि आनंद देणारं ठरतं. यावेळी मनावर साठलेली धूळ- माती झटकून टाकण्यासाठीही प्रत्येकानंच प्रयत्न करावा असा संदेश दिला जातो.