Dead Body Ritual: रात्री मृतदेह का जाळत नाहीत? गरुड पुराण काय सांगते, जाणून घ्या
अंत्यसंस्कारावेळी काही नियमांचं पालन करावं लागतं. गरुड पुराणात याबाबत सविस्तर सांगितलं गेलं आहे.
Garuda Puran Antim Sanskar Niyam: जगातील प्रत्येक व्यक्तीला मृत्यू हा आहेच. मृत्यू हे जगातील अंतिम सत्य मानलं जातं. हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार केले जातात. मृत्यू झाल्यानंतर मृतदेहावर शेवटचा संस्कार केला जातो. हिंदू धर्मात मृतदेहाला विधीनंतर अग्नी दिला जातो. अंत्यसंस्कारावेळी काही नियमांचं पालन करावं लागतं. गरुड पुराणात याबाबत सविस्तर सांगितलं गेलं आहे. हिंदू धर्मानुसार रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार केले जात नाही. कारण या दरम्यान स्वर्गाचे दरवाजे बंद होतात आणि नरकाचे दरवाडे उघडे होतात, अशी समज आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार केल्यास संबंधित व्यक्तीला नरकयातना भोगाव्या लागू शकतात. त्यामुळे रात्री अंत्यसंस्कार केले जात नाहीत.
अंत्यसंस्कारापूर्वी आत्मा मृतदेहाच्या आसपास असते, असा धार्मिक समज आहे. मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर आत्मा तेथून निघून जाते. त्याचबरोबर पुर्नजन्मावेळी व्यक्तीला अंगदोष येऊ शकतो. यासाठी संध्याकाळी उशिरा किंवा रात्री मृत्यू झाल्यानंतर शव पूर्ण रात्रभर तसंच ठेवलं जातं. सूर्योदयानंतर अंतिम संस्कार केले जातात.
घरातील पुरुषच व्यक्तीला अग्नी देतात असा उल्लेख गरुड पुराणात आहे. मात्र, आता या परंपरा आता बदलत असून मुलींही वडिलांना अग्नी देत आहेत. महिलांकडून अग्नी न लावण्यामागील एक कारण म्हणजे अंत्यसंस्कार करताना मृतदेह पाहताना बळकट शरीर आणि मनाची गरज असते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)