सोन्याचे दागिने परिधान करण्याची योग्य पद्धत कोणती? पाहा समज आणि गैरसमज
प्रत्येक राशीसाठी कोणता धातू किंवा रत्न परिधान करावं हे सांगण्यात आलं आहे. चंद्र आणि शुक्रासाठी चांदी तर मंगळ ग्रहासाठी तांबे शुभ मानलं जातं.
मुंबई : प्रत्येक गोष्टीमागे एक शास्त्र असतं असं घरातील थोरमोठे व्यक्ती आपल्याला कायम म्हणतात. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचाही धातूशी संबंध जोडण्यात आला आहे. प्रत्येक राशीसाठी कोणता धातू किंवा रत्न परिधान करावं हे सांगण्यात आलं आहे. चंद्र आणि शुक्रासाठी चांदी तर मंगळ ग्रहासाठी तांबे शुभ मानलं जातं.
बुध ग्रहासाठी सोनं शुभं मानलं जातं. तर राहुल आणि शनिचा संबंध लोह धातूशी जोडला जातो. स्त्रियांना सोन्याचं फार अप्रूप असतं. साजश्रृंगारात सोनं घालणं फार आवडतं. सोन्याचे दागिने घालण्याची योग्य पद्धत कोणती आणि त्याबाबत गैरसमज किंवा समज काय आहेत आज त्याबाबत जाणून घेणार आहोत.
पायात सोन्याचे दागिने का घालू नयेत?
ज्योतिष शास्त्रानुसार डोक्याला सूर्याचं तर पायाला शनीचं प्रतीक मानलं जातं. सूर्य आणि शनी परस्पर शत्रू असल्याचं मानलं जातं. त्याशिवाय दोन्ही धातू वेगवेगळ्या प्रकारे काम करतात. सोन्याची प्रकृती उष्ण तर चांदीची थंड असते. डोकं शांत आणि पाय नेहमी गरम राहायला हवेत म्हणून पायात चांदीचे पैंजण तर गळ्यात सोन्याचं आभूषण घातलं जातं.
महिलांनी चुकूनही गळ्यात चांदीची आभूषणं घालू नयेत असं सांगितलं जातं. शिवाय पायात सोन्याचे पैंजण घालू नयेत. त्यामुळे मानसिक त्रास, आजार आणि आर्थिक नुकसान होऊ शकतं. सोन्याला धन आणि लक्ष्मीच्या रुपाने पाहिलं जातं. त्यामुळे ते पायात घातला तर अपमान होतो असंही काहीजण मानतात.
नकारात्मकतेचा धोका
ज्योतिष शास्त्रानुसार काही राशींवर सोन्याचे अलंकार घातले तर त्याचा नकारात्मक परिणामही होत असतो. तूळ, मकर लग्न राशीच्या महिलांवर सोन्याचा नकारात्मक प्रभावही पडतो. या महिलांना आरोग्याशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते असं मानलं जातं.
सोनं कोणत्या राशीसाठी शुभ
मेष, कर्क, सिंह आणि धनु लग्न राशीसाठी सोन्याचे अलंकार घालणं सर्वोत्तम मानलं जातं. तर वृश्चिक आणि मीन लग्न राशीच्या महिलांना याचे चांगले वाईट दोन्ही परिणाम पाहायला मिळतात. वृषभ, मिथुन, कन्या आणि कुंभ लग्नरास असलेल्या महिलांसाठी सोन्याचे शुभ परिणाम दिसत नाहीत असं ज्योतिष शास्त्रातील जाणकार सांगतात. तूळ आणि मकर राशीच्या व्यक्तींनी सोनं कमी धारण करावं असंही सांगतात.
गळ्यात सोन्याचे अलंकार घातल्याने त्याचे काय परिणाम होतात ते जाणून घेऊया. आनंद मिळवण्यासाठी गळ्यात चेन तर एकाग्रता वाढवण्यासाठी तर्जनीमध्ये अंगठी घालावी. घरात जर तुम्ही सोनं ठेवत असाल तर ते ईशान्य आणि नैऋत्य दिशेला ठेवाव. सोनं नेहमी लाल कापडामध्ये बांधून ठेवाव. त्याचे शुभ परिणाम आपल्याला दिसतात.