मुंबई : नवीन वर्षात सूर्याचा पहिले राशी परिवर्तन  (Surya Rashi Parivartan 2022) 14 जानेवारी रोजी होणार आहे. यावेळी सूर्य देव धनु राशीत असतो. 14 जानेवारी रोजी तो मकर राशीत प्रवेश करेल. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीकोनातून सूर्याचा राशी बदल खूप खास आहे. कारण तो सर्व राशींचा राजा मानला जातो. सूर्याची रास बदलल्याने खरमास संपेल, तर राशींवरही त्याचा परिणाम होईल. सूर्याचा हा राशी बदल काही राशींसाठी फायदेशीर ठरेल. या राशी कोणत्या आहेत हे तुम्हाला माहीत आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी सूर्याचे भ्रमण शुभ सिद्ध होईल. सूर्याचे संक्रमण होताच नशिबाची पूर्ण साथ सुरु होईल. सूर्याच्या संक्रमणादरम्यान तुम्ही कोणतेही काम कराल, तुम्हाला सकारात्मक लाभ मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल, त्यामुळे मन शांत आणि आनंदी राहील. सूर्यदेवाला नियमित जल अर्पण केल्यास विशेष लाभ होतो. यासोबतच समाजात मान-सन्मान मिळेल. याशिवाय नोकरीत प्रगती होईल.


सिंह: सूर्याचा हा राशी बदल सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. आर्थिक जीवन आनंदी राहील. नोकरदार व्यक्तीमध्ये पदोन्नतीची चांगली बातमी मिळू शकते. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळतील. याशिवाय, संक्रमणादरम्यान तुम्हाला कठोर परिश्रमाचा पूर्ण लाभ मिळेल.


वृश्चिक: सूर्याचा हा राशी बदल तुमच्या सर्व कामांसाठी चांगलाच असेल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुमच्या कामाला प्रमोशनही मिळण्याची शक्यता आहे. रोजचे उत्पन्न वाढेल. याशिवाय पृथ्वीशी संबंधित काम करणाऱ्यांनाही सूर्याच्या भ्रमणाचा लाभ होईल.


मकर : सूर्य राशीत बदल करुन तो या राशीत येईल. त्यामुळे या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. नोकरीत यश आणि मान-सन्मान वाढेल. या राशीचे लोक जे सरकारी नोकरीत आहेत त्यांना प्रमोशन मिळू शकते. याशिवाय जे लोक सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांची इच्छा पूर्ण होणास मदत होईल.


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)