मुंबई : नवीन वर्षाकडून प्रत्येकाला आशा असते की येतं वर्ष हे आपल्याला भरपूर आनंद आणि उत्साह घेऊन येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच या आनंदाच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीचं लक देखील महत्वाचं असतं. 2018 साली आपल्या भरपूर आनंद आणि ऐश्वर्य मिळावं यासाठी हे 10 गुडलक चार्म तुमच्या घरी ठेवाय. 
जेणे करून तुम्हाला अगदी वर्षाच्या सुरूवातीपासूनच याची अनुभूती येईल. 



1) धातूचा कासव 


चांदी किंवा पितळेचा कासव आपल्या घरी घेऊन या. चांगल्या लकसाठी आणत असलेली ही वस्तू चांगल्या धातूची असावी यावर लक्ष असू द्या. काही लोकं माती किंवा इतर मटेरियल पासून बनलेला कासव आपल्या घरी घेऊन येतात. मात्र असं करू नका. धातूच्या कासवामुळे घरात सुख - शांती आणि सौभाग्य चांगल राहतं. 



2) क्रिस्टल पिरॅमिड 


गुडलक चार्मसाठी घरात क्रिस्टल पिरॅमिड घरी घेऊन या. या चार्मला अशा जागी ठेवा जिथे सूर्याची किरणं पडतील. यामुळे घरातील नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक विचारांमध्ये वाढ होते. 



3) पोपट 


घरात पोपट आणल्यामुळे पती - पत्नीचे संबंध सुधारतात. पोपटाचे पंख खऱ्या अर्थाने पृथ्वी, अग्नि, जल, लाकूड आणि धातूचे प्रतिक आहेत. घरात पोपट असल्यामुळे वातावरणात एक चैतन्य असते. ज्यामुळे घर समृद्ध राहते. 



4) गोमती चक्र 


गोमती चक्र हे माता लक्ष्मीचे प्रिय आहे. त्यामुळे धनवृद्धि प्राप्त करण्यासाठी गोमती चक्र महत्वाचे आहे. हे गोमती चक्र पिवळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये लपेटून तिजोरीमध्ये ठेवल्यास संपत्तीमध्ये वाढ होते. 



5) चांदीचा हत्ती 


चांदीचा भरलेला हत्ती घरात ठेवल्याने लक्ष्मीची कृपा कायम राहते. घरात चांदीचा हत्ती आणल्यावर स्वच्छ जागी ठेवा. हत्तीमुळे घरात राहू आणि केतूचा प्रभाव कमी होतो. 



6) दक्षिणावर्ती शंख 


दक्षिणावर्ती शंख ऐश्वर्य आणि समृद्धीचा प्रतिक आहे. या शंखाचे पूजन करावे. पूजा आणि त्याचे ध्यान करणाऱ्या व्यक्तीला धन संपदा संपन्न होते. आणि व्यवसायात सफलता प्राप्त होते.



7) माळ 


कमलगट्टयाची ही माळ लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. याची माळ मंदिरात ठेवल्यामुळे आणि या माळेला जपल्यामुळे आपल्या इष्टदेवाचे 108 वेळा नामस्मरण असेल. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. माळ असलेल्या घरात संपन्नता आणि सुख प्राप्त होते.