Gudi Padwa Shubh Muhurat 2023 in marathi : हिंदू धर्माचं नवं वर्ष म्हणजे गुढी पाडवा...श्रीखंड पुरी तर कुठे हापूस आंब्याची गोडी...चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला 22 मार्च 2023 ला साजरा करण्यात येणार आहे. तर शुभ मुहूर्त, पूजा विधी, साहित्य आणि गुढी नेमकी कोणत्या दिशेला उभारावीत. या सगळ्याबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर...


गुढीपाडवा शुभ मुहूर्त 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चैत्र शुक्लपक्ष प्रतिपदा प्रारंभ : रात्री 09.22 पासून (21 मार्च 2023 मंगळवार)
चैत्र शुक्लपक्ष प्रतिपदा समाप्ती : संध्याकाळी 06.50 पासून (22 मार्च 2023 बुधवार)
उदय तिथी नुसार 22 मार्च 2023 बुधवारला गुढी पाडवा साजरी होणार 
गुढी पाडवा पूजा मुहूर्त: सकाळी 06.29 AM ते सकाळी 07.39 AM (22 मार्च 2023)


गुढी उभा करण्यासाठी साहित्य


  • वेळूची काठी

  • कडुलिंबाचा पानं

  • आंब्याची पानं

  • दोन तांब्याचे कलश

  • काठापदराची साडी

  • ब्लाऊज पीस

  • साखरेचा हार

  • खोबऱ्याचा हार

  • लाल कलरचा धागा

  • चौरंग किंवा पाठ

  • फुलांचा हार


गुढी पूजा साहित्य 


  • कलश

  • हळदी

  • कुंकू

  • तांदूळ

  • पाणी

  • पंचामृत

  • साखर

  • पिवळे चंदन

  • अक्षदा

  • थोडीशी फुलं

  • आरती

  • कापूर

  • अगरबत्ती किंवा धूप

  • लक्ष्मी मातेची नाणी

  • सुपारी

  • पानं

  • सुपारी


गुढी पाडवा पूजा विधी


  • वेळूची काठी स्वच्छ धूवा. 

  • आता त्या काठीवर साडी आणि ब्लाऊज पीस दोरीच्या साह्याने बांधा.

  • आंब्याची पानं आणि कडुलिंब बांधा. 

  • साखरेची माळ आणि फुलांचा हार घाला.

  • कलशावर पाच हळदीकुंकाचे बोट लावा. 

  • शिवाय स्वास्तिक काढा. 

  • आता हे कलश काठीवर पालथ घाला. 

  • ही गुढी पाट किंवा चौरंगावर उभी घराच्या मुख्य दाराजवळ उभी करा. 



ही कामं नक्की करा!


21 मार्चला ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करुन देवाची विधीवत पूजा करा. 


ज्या पाट किंवा चौरंगावर गुढी उभारणार त्यावर पांढरा कपडा नक्की परिधान करा. 


त्यावर हळदीकुंकाने अष्टकोनी कमळ बनवा. 


कमळाच्या मध्यभागी ब्रह्मदेवाची मूर्ती ठेवून पूजा करा.


गणपतीची आराधना करताना ‘ओम ब्रह्मणे नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करावा.


या दिवशी कडुलिंबाच्या पानाची पावडर बनवून मीठ, हिंग, जिरे, काळी मिरी आणि साखर घालून सेवन करा.