Gudi Padwa 2023 Panchang : गुढी पाडव्याच्या दिवशी सर्वच मुहूर्त शुभ, पण नेमकं सोनं खरेदीसाठी कधी जावं?
Gudi Padwa 2023 Panchang : आजचं पंचांग थोडं खास आहे, कारण आजचा दिवसही तसाच आहे. एका नव्या पर्वाची सुरुवात आजपासून होत आहे. त्यामुळं या पर्वात यशाची गुढी उभारण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा
Gudi Padwa 2023 Panchang : आज बुधवार, गुढी पाडवा. म्हणजेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि मराठी नव वर्षाचा दिवस. अशा या दिवशी अनेक शुभकार्य करण्याचं तुम्ही योजलं असेल. एखादं वाहन, सोनं किंवा एखादी नवी वस्तू घरात आणण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल. अशा या मंगलदिनी काही मुहूर्त तुम्हाला भरभरून लाभ देणार आहेत.
तसं पाहिलं, तर गुढी पाडव्याच्या दिवशी प्रत्येक मुहूर्त शुभ आणि तितकाच लाभदायी. पण, या खास दिवशी सगळी कामं खास पद्धतीनं व्हायला हवीत असाच तुमचा अट्टहास असेल तर आताच पाहून घ्या आजचं पंचांग. मनीच्या सर्व इच्छा पूर्ण होवून तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तम राहो हीच प्रार्थना आणि पाडव्याच्या शुभेच्छा. चला पाहूया आजचं पंचांग.... (Gudi Padwa 2023 22 march wednesday todays panchang astro news in marathi )
आजचा वार - बुधवार
तिथी- प्रथम
नक्षत्र - उत्तराभाद्रपद
योग - शुक्ल, ब्रह्म
करण- किन्स्तुघ्ना, भाव
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 06:23 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.33 वाजता
चंद्रोदय - सायंकाळी 06.47 वाजता
चंद्रास्त - सकाळी 07:07 वाजता
चंद्र रास- मीन
आजचा अशुभ काळ
दुष्टमुहूर्त– 12:04:05 पासुन 12:52:44 पर्यंत
कुलिक– 12:04:05 पासुन 12:52:44 पर्यंत
कंटक– 16:55:59 पासुन 17:44:38 पर्यंत
राहु काळ– 12:28:25 पासुन 13:59:38 पर्यंत
हेसुद्धा वाचा : Horoscope 22 March 2023 : गुढी पाडवा विशेष राशीभविष्य; जाणून घ्या कसा असेल दिवस
कालवेला/अर्द्धयाम– 07:12:11 पासुन 08:00:50 पर्यंत
यमघण्ट–08:49:29 पासुन 09:38:08 पर्यंत
यमगण्ड– 07:54:45 पासुन 09:25:58 पर्यंत
गुलिक काळ– 10:57:11 पासुन 12:28:25 पर्यंत
शुभ काळ
अभिजीत मुहूर्त - आज मुहूर्त नाही
गुढी उभारण्यासाठीचा मुहूर्त - सकाळी 6.29 ते 7.39 मिनिटापर्यंत.
आजच्या दिवशी सोनं खरेदी करणं अतिशय लाभदायक मानलं जातं. त्यासाठी अमुक एका मुहूर्ताची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. त्यामुळं आजच्या दिवसात कधीही सोनं खरेदी करा.य
चंद्रबलं आणि ताराबल
ताराबल - ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती, अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा
चंद्रबल- वृषभ, मिथुन, कन्या, तुळ, मकर, मीन
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)