Daily Horoscope 22 March 2023 :आजचा दिवस अत्यंत खास आहे. कारण आज गुढी पाडव्याचा (Gudi Padwa 2023 ) सण आहे. यंदा गुढीपाडव्याला गजकेसरी योग जुळून आला आहे. यामुळे आजच्या दिवसाचे राशीभविष्य देखील खास आहे. अनेक राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायी ठरणार आहे. जाणून सर्व 12 राशींचे राशीभविष्य.


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनाची इच्छा पूर्ण होईल. करियरमध्ये बदल करण्याचा विचर केल्यास यश मिळेल. पैसे देवाण घेवाण करण्याचे व्यवहार करु नका. शुभ रंग आकाशी.  


वृषभ (Taurus)


मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम व्हाल. जवळच्या लोकांचे सहकार्य मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेले काम मार्गी लागले. वेळेचा योग्य सदुपयोग करा. शुभ रंग निळा.


मिथुन (Gemini)


कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. पुत्र प्राप्तीचे सुख मिळू शकते. व्यवसायात यश मिळेल. नात्यांचा सन्मान करा, निश्चित फायदा होईल. शुभ रंग तपकिरी. 


कर्क (Cancer)


चांगला स्वभाव आणि व्यवहार यामुळे तुमचे महत्वाचे काम मार्गी लागू शकते. प्रेम संबंध बिघडू शकतात.  मालमत्तेमध्ये गुंतवणूक करु नका. शुभ रंग गुलाबी


सिंह (Leo)


आर्थिक समस्येतून सुटका होईल. तुमचं कतृत्वच तुमची पात्रता सिद्ध करेल. वेळ तुमच्यासठी अनुकूल नाही. शेयर बाजारात गुंतवणूक टाळा. शुभ रंग चॉकलेटी.


कन्या (Virgo)


आई वडिलांच्या आरोग्याची चिंता राहील. कुणालाही वाहन अथवा  पैसे उधार देऊ नका. परदेश यात्रेचा योग येवू शकतो. रात्री उशीरापर्यंत जागरण करु नका. शुभ रंग चॉकलेटी.


तूळ (Libra)


सकारात्मक उ्रजेने कामाला सुरुवात करा. दुपारनंतर काहीसा तणाव राहील. महत्वाची कामे वेळेत पूर्ण करा. शुभ रंग सफेद


वृश्चिक (Scorpio)


जुन्या गोष्टी उकरुन काढू नका. यामुळ नुकसान टळेल. आरोग्यकडे लक्ष द्या. जोडाराच्या सहवासामुळे आनंद मिळेल. शुभ रंग मेहरून


धनु (Sagittarius)


कार्यशैली बदल करु नका. नुकसान होवू शकते. पायाला जखम होवू शकतो. चांगली बातमी मिळेल. शुभ रंग पिवळा. 


मकर (Capricorn)


नातेसंबधांमधील वाद विवाद दूर होतील. कुणाला पैसे उधार दिले असल्यास परत मिळतील. दिवस आनंदात जाईल. शुभ रंग चॉकलेटी. 


कुंभ (Aquarius) 


मैत्रीत संशय घेवू नका. संपूर्ण दिवस कामात व्यस्त रहाल. अचानक वाहन बिघडू शकते. शुभ रंग गुलाबी


मीन (Pisces)


सहकाऱ्यांशी वाद विवाद टाळा. दुर्लक्ष करु नका. वाहन खरदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. नात्यात गोडवा येवू शकतो.  शुभ रंग मरून