Guru Gochar 2023: 12 वर्षांनंतर घडणार `हा` योगायोग; गुरुच्या परिवर्तनाने `या` राशी होणार मालामाल
Guru Gochar 2023 : या बृहस्पतिच्या राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर प्रभाव पडणार आहे. मात्र काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा शुभ लाभ मिळू शकणार आहेत. या राशी कोणत्या आहेत, हे जाणून घेऊया.
Guru Gochar 2023 : ज्योतिष शास्त्राप्रमाणे, कुंडलीत उपस्थित असलेले प्रत्येक ग्रह हे काही ठराविक वेळेनुसार आपली राशी बदलतात. वैदिक धार्मिक शास्त्रानुसार, 22 एप्रिल रोजी गुरु ग्रह मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी 1 मे 2024 पर्यंत ते या राशीमध्ये विराजमान राहणार आहेत. तब्बल 12 वर्षांनी हा योगायोग होणार आहे.
दरम्यान या बृहस्पतिच्या राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर प्रभाव पडणार आहे. मात्र काही राशी अशा आहेत, ज्यांना याचा शुभ लाभ मिळू शकणार आहेत. या राशी कोणत्या आहेत, हे जाणून घेऊया.
वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांवर गुरुच्या राशी परिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. या राशीच्या व्यक्तींना लोकांना नवीन कामाच्या सुरुवातीला फायदा होणाप आहे. तसंच तुमची काही अडकेलली काम असतील ती पूर्ण होऊ शकणार आहेत. या कालात तुम्ही लोकांशी गोड आणि नम्रतेने बोललात तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. कशा पद्धतीने बचत करू शकता याचाही विचार करावा.
मिथुन रास
गुरूचं होणारं परिवर्तन हे मिथुन राशीच्या अकराव्या घरात होणार आहे. गुरूच्या परिवर्तनामुळे मिथुन राशीच्या लोकांना त्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन स्तोत्र मिळू शकणार आहे. गुरुचं परिवर्तन हे तुम्हाला अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. तुम्ही जी काही कामं केली असतील त्यांचे तुम्हाला शुभ परिणाम मिळणार आहे.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांसाठी गुरूचं हे परिवर्तन लाभदायक ठरू शकतं. यावेळी या सिंह राशीच्या लोकांना अचानक अज्ञात स्त्रोताकडून पैसे मिळू शकतात. येणारा काळ हा या राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायक ठरणार आहे.
कन्या रास
कन्या राशीच्या व्यक्तींना या परिवर्तनाचा लाभ होऊ शकणार आहे. कन्या राशीचे लोक गुंतवणूक करण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा आणि योग्य काळ असणार आहे. येणाऱ्या काळात तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवणार आहात. कोणत्याही प्रकल्पासाठी नवीन योजना आखण्यात तुम्हाला यश येणार आहे. प्रेमसंबंधामध्ये सर्व गोष्टी अनूकूल असणार आहेत.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)