Guru Pradosh Vrat 2023: सर्व मनोकामना पूर्ण करणारे व्रत म्हणजे गुरु प्रदोष व्रत (Guru Pradosh Vrat 2023). यंदा 2 फेब्रुवारीला गुरु प्रदोष व्रत आहे. या व्रताच्या दिवशी पूजा करुन महादेवाला प्रसन्न करावे. पूजेची शुभ वेळ आणि पद्धत जाणून घ्या. हे व्रत पूर्ण केल्यास सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते.


अशी आहे या व्रताचा अख्यायीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दिवशी व्रत आणि शिवाची आराधना केल्याने कार्यात यश, शत्रूंवर विजय, ऐश्वर्य इत्यादी प्राप्त होते. नियमानुसार गुरु प्रदोषाचे व्रत केल्यास कोणत्याही विशिष्ट कार्य योजनेत यश मिळते. हे व्रत पाळल्याने इंद्रदेव वृत्तासुराचा पराभव करण्यात यशस्वी झाला होता अशी अख्यायीका आहे. हे व्रत शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी देखील ओळखले जाते. 


हिंदू कॅलेंडरनुसार, प्रत्येक महिन्यात शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या दोन त्रयोदशी असतात. या त्रयोदशीमध्ये भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. विशेष इच्छा असल्यास  दर महिन्याला येणाऱ्या त्रयोदशीला व्रत करून तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. या महिन्यात त्रयोदशी 02 फेब्रुवारी, गुरुवारी येत आहे. याला गुरु प्रदोष व्रत म्हटले जाते. या दिवशी माता पार्वती आणि महादेवाची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. 


गुरु प्रदोष व्रतच्या पूजेची शुभ वेळ आणि पद्धत 


 गुरु प्रदोष व्रत 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 04:26 वाजता सुरू होईल. 03 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 06:57 वाजता याची समाप्ती होईल. प्रदोष व्रताची पूजा संध्याकाळीच केली जाते, त्यानंतर पूजाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 06 ते रात्री 08.40 पर्यंत आहे. 


गुरु प्रदोष व्रत आणि उपासनेची 


गुरु प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. यानंतर भगवान शंकराची आराधना करून व्रत आणि उपासनेचे व्रत ठेवण्याचा संकल्प मनात धरावा. संध्याकाळच्या शुभ मुहूर्तावर शिव मंदिरात किंवा घरात भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती एकत्र स्थापित करा. जर तुम्ही मंदिरात पूजा करत असाल तर शिवलिंगाला गंगाजल किंवा कच्च्या गाईच्या दुधाचा अभिषेक करावा. यानंतर मूर्तीवर किंवा शिवलिंगावर पांढर्‍या चंदनाचा लेप लावून अक्षत, बेलपत्र, शमीपत्र, भांग, धतुरा, पांढरी फुले, मध, भस्म आणि साखर इत्यादी भगवान शंकराला अर्पण करावे.


पूजा करत असताना मन इकडे तिकडे भटकू नये हे ध्यानात ठेवा. या दरम्यान "ओम नमः शिवाय" या मंत्राचा जप करत राहा. गुरु प्रदोष व्रताच्या दिवशी शिव चालिसा पाठण करा. त्यानंतर गुरु प्रदोष व्रताची कथा वाचा. भगवान शिव आणि माता पार्वतीला भोग अर्पण केल्यानंतर तुपाचा दिवा लावून आरती करावी. पूजा पूर्ण झाल्यानंतर क्षमा मागताना तुमची इच्छा बोलून दाखवावी. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून पुन्हा भगवान शंकराची पूजा करावी आणि सूर्योदयानंतर उपवास सोडावा.