मुंबई : 13 जुलै 2022 रोजी म्हणजेच उद्या गुरुपौर्णिमा आहे. आषाढ महिन्यातील पौर्णिमा हा महर्षी वेद व्यास यांचा जन्मदिवस असून ती गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला खूप महत्त्व आहे आणि यंदाची गुरुपौर्णिमा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप खास आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरु पौर्णिमेला 4 राजयोग तयार होत आहेत जे 3 राशीच्या लोकांचे भाग्य बदलेल. गुरु पौर्णिमा 2022 च्या दिवशी मंगळ, बुध, गुरु आणि शनि शुभ स्थितीत आहेत. यामुळे ते रुचक, भद्रा, हंस आणि ष नावाचे चार राजयोग बनवत आहेत. याशिवाय या दिवशी बुधादित्य योगही तयार होत आहे. जाणून घ्या कोणत्या राशीला या सर्व योगांचा सर्वाधिक फायदा होईल.


गुरुपौर्णिमेला या लोकांचे नशीब उजळेल


वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरुपौर्णिमेचा योग अतिशय शुभ सिद्ध होईल. त्यांना पैसा मिळेल. अडकलेला पैसा सोडवता येईल. व्यापाऱ्यांनाही फायदा होईल. संवादातून अनेक गोष्टी मार्गी लागतील. 


सिंह : सिंह राशीच्या लोकांनाही गुरु पौर्णिमेचा फायदा होईल. त्यांच्या संपत्तीत वाढ होईल. उत्पन्नात कायमस्वरूपी वाढ होऊ शकते. बचत करण्यात यश मिळेल. व्यापाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळू शकते. कामात यश मिळेल.


कन्या: 2022 च्या गुरु पौर्णिमेला तयार होणारा राजयोग कन्या राशीच्या लोकांसाठी वरदान ठरेल. नवीन नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. पदोन्नती, पगारातही वाढ होऊ शकते. उत्पन्न वाढेल. व्यापाऱ्यांना फायदा होईल. नवीन करार होऊ शकतो, जो फायदेशीर ठरेल.