Guru Pushya Yog 2024 : या वर्षातील शेवटचा गुरु पुष्य योग अतिशय खास असणार आहे. यादिवशी पुष्य नक्षत्रासह अनेक योग जुळून आले आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रात पुष्य नक्षत्र अतिशय शुभ मानला जातो.जेव्हा तो गुरुवारी येतो तेव्हा त्याला गुरु पुष्य योग असं म्हटलं जातं. यादिवशी रवि, सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी योगदेखील असणार आहे. गुरु पुष्य योग खरेदीसाठीही शुभ मानला जातो. यादिवशी वाहन, मालमत्ता, घर, कपडे, दागिने इत्यादी खरेदी करण्यासोबत नवीन व्यवसाय सुरू केले जातात. हा शुभ योग काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. त्यांच्यावर मात लक्ष्मीची कृपा बरसणार असून त्यांना आर्थिक फायदा होणार आहे. (guru pushya yoga on 21 november these zodiac sign get money)


कधी आहे गुरु पुष्य योग?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार पुष्य नक्षत्र 21 नोव्हेंबरला सकाळी 6.49 वाजेपासून दुपारी 3.35 वाजता असणार आहे. तर रवि योग 15:35 ते सकाळी 06:50 पर्यंत असेल. याशिवाय अमृत सिद्धी आणि सर्वार्थ सिद्धी योग देखील असणार आहे. जो सकाळी 06:49 ते 15:35 पर्यंत राहील.


गुरु पुष्य योग या राशींसाठी वरदान!


मीन रास


या राशीच्या लोकांसाठी गुरु पुष्य योग खूप फायदेशीर ठरणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं मार्गी लागणार आहे. त्यामुळे उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत उघडणार आहे. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या आता संपुष्टात येणार आहे. यासोबतच तुम्ही वाहन, मालमत्ता किंवा घर खरेदी करण्याची योजना आखू शकता. तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असणार आहे. अशा परिस्थितीत अनेक धार्मिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होणार आहात. प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. यासोबतच आर्थिक संकटातूनही दिलासा मिळणार आहे. 


धनु रास 


या राशीच्या लोकांसाठी बृहस्पति भाग्यवान सिद्ध होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणार आहे. बौद्धिक क्षमता आणि आत्मविश्वास वाढणार आहे. ज्यामुळे तुम्ही प्रलंबित किंवा सरकारी काम पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहात. तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळणार आहे. अशा परिस्थितीत तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. परदेशात जाण्याचीही संधी मिळणार आहे. नोकरदार लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांना प्रमोशनसोबत काही मोठी जबाबदारी मिळणार आहे. 


मिथुन रास


या राशीच्या लोकांसाठीही गुरु पुष्य योग खूप फायदेशीर सिद्ध होणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पुन्हा सुरू होणार आहेत. यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकतो. अचानक आर्थिक लाभ होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित करणार आहात. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून तुम्हाला लाभ मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक यश होणार आहात. तुम्हाला पालक आणि शिक्षकांचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)