Guru Vakri 2023: गुरु मेष राशीमध्ये झाला वक्री; `या` राशींच्या व्यक्तींना गुंतवणूकीत मिळणार भरपूर लाभ
Guru Vakri 2023 : सोमवारी म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी गुरु ग्रह मेष राशीत वक्री झाला आहे. गुरूच्या वक्री चालीचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.
Guru Vakri 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा सर्वात प्रभावशाली ग्रह मानला जातो. गुरु ग्रह हा सुख, सौभाग्य, कीर्ती इत्यादींचा कारक मानला जातो. सोमवारी म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी गुरु ग्रह मेष राशीत वक्री झाला आहे. गुरूच्या वक्री चालीचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे.
मात्र यावेळी काही राशी आहेत, ज्यांना गुरू ग्रहाची वक्री चाल खूप फायदेशीर ठरणार आहे. गुरुच्या वक्री चालीने काही लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत. जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत, ज्यांना गुरु ग्रहाच्या वक्री चालीने अच्छे दिन येणार आहेत.
मेष रास
गुरूच्या वक्री दृष्टीचा प्रभाव मेष राशीच्या लोकांवर अधिक राहणार आहे. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. या काळात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुम्ही करत असलेल्या कामाचे चांगले परिणाम मिळतील. यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमच्या साहस आणि शौर्यामध्येही वाढ होईल. या काळात तुम्हाला चांगला नफा होऊ शकतो.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांना गुरु शुभ फळ देणारा ठरणार आहे. या काळात कुटुंबात काही शुभ कार्य होऊ शकतात. नोकरदार लोकांसाठी हा काळ शुभ आहे. या काळात नशीब पूर्ण साथ देणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होतील. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल. वैवाहिक जीवनात अनेक आनंद मिळतील.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांसाठी हा चांगला काळ आणणार आहे. या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे. नोकरीतील लोकांना अपार यश मिळू शकतं. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात. नोकरी-व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )