Hanuman Chalisa Path: हनुमानची मनोभावे पूजाविधी केला तर तुमची अनेक संकटे दूर होतात. मात्र, योग्य प्रकारे हनुमान चालिसा पठण केले तर त्याचे खूप फायदे आहेत. हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. मंगळवार आणि शनिवार हे हनुमानजींची पूजा करण्याचे दिवस आहेत. या दिवशी हनुमानजींच्या पूजेबरोबरच हनुमान चालिसाचे पठण केल्यास हनुमानाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. हनुमान चालिसाचे नियमित पठण केल्याने तो लवकर प्रसन्न होतो आणि भक्तांना आशीर्वाद देतो असे शास्त्रात सांगितले आहे. मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे जाणून घेऊ या.


हनुमान चालिसा पठण केल्याने संकट होईल दूर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोक आपल्या परिने नेहमी हनुमान चालिसाचा पाठ करतात. काही लोक हे नियमित करतात, तर काही लोक फक्त मंगळवार आणि शनिवारी हनुमान चालिसाचे पठण करण्याला प्राधान्य देतात. असे मानले जाते की हनुमान चालिसाचा पठण केल्याने माणसाला केवळ मानसिक शांती मिळत नाही. उलट संकटही दूर होते. प्रत्येकाने हनुमान चालिसाचे पठण करावे असे सांगितले जाते. पण त्याचे नियम आणि कायदे नीट जाणून घ्या. (अधिक वाचा : मासिक भविष्य - डिसेंबर महिन्यात अच्छे दिन, या 5 राशींच्या लोकांवर होईल पैशाचा वर्षाव)


हनुमान चालिसाचे पठण करण्याचे नियम


- हनुमान चालिसाचे पठण करताना मन शांत ठेवावे. त्यादरम्यान फक्त हनुमान चालिसाचे श्लोक ध्यानात ठेवावेत. 


- हनुमान चालिसाचे पठण करताना पूजास्थान स्वच्छ व टापटीप असावे. तसेच बसण्याची जागा स्वच्छ आणि शुद्ध करुन घ्या. 


- ज्योतिषशास्त्रानुसार हनुमान चालिसाचे पठण एकाच ठिकाणी बसून करावे. हनुमान चालिसाचे पठण मंदिर, घर किंवा कोणत्याही तीर्थक्षेत्रात करता येते. 


- हनुमान चालिसाचे पठण ठराविक वेळीच करावे असे सांगितले जाते. जसे की सकाळ किंवा संध्याकाळ. 


- हनुमान चालिसाचे पठण करताना लाल रंगाच्या फुलांचा वापर करावा. 


- ज्योतिषशास्त्रानुसार चालिसा सुरु करण्यापूर्वी दिवा लावावा. दिव्याची वातही लाल धाग्याची असावी. तसेच दिव्यात शुद्ध तूप असावे. 


- हनुमान चालिसाचे पठण पूर्ण झाल्यावर हनुमानाला गूळ आणि हरभरा अर्पण करा. याशिवाय केशर बुंदी, बेसनाचे लाडू, चुरमा आदी पदार्थांचा भोग चढवला जातो.



(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)