Astrology : निरोगी आयुष्यासाठी खाद्य ज्योतिषशास्त्रनुसार आहारात करा बदल; पाहा तुमच्या राशीसाठी कोणतं पदार्थ योग्य
Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आपले ग्रह तारे काय सांगतात यावर आपलं भविष्य सांगितलं जातं. तसंच खाद्य ज्योतिषशास्त्र आपण राशीनुसार आपला आहार कसा असावा हे सांगितलं जातं.
Astrology : अनेकांना वाटतं ज्योतिषशास्त्रात भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्य सांगितलं जातं. पण या ज्योतिषशास्त्राच्या उपयोग आपल्या दैनंदिन जीवनातही होतो. आपल्या आयुष्यातील अनेक समस्यांवर ज्योतिषशास्त्रातून उपाय सापडतात. त्याशिवाय तुमच्या राहणीमानापासून ते आहारशैलीपर्यंत ज्योतिषशास्त्र आपल्याला दिशा दाखवतात. निरोगी जीवनासाठी फूड अॅस्ट्रॉलॉजी (Food Astrology)म्हणजे खाद्य ज्योतिषशास्त्र आपल्याला आपल्या रासीनुसार काय खायला पाहिजे ते सांगते. (have food according to your zodiac sign for benefits your health astrology news in marathi)
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक रासीची विभागणी ही चार तत्त्वांमध्ये केली आहे. अग्नी, जल, वायू आणि पृथ्वी अशी रासीची विभागणी झाली आहे. उत्तम आरोग्यासाठी राशीप्रमाणे आहार घेतल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल, असं ज्योतिशास्त्र तज्ज्ञ म्हणतात.
आपली रासही सांगते काय खावं?
मेष (Aries)
टोमॅटो, कांदा, डाळी, कोबी, काकडी, मोडाचे कडधान्य, अंजीर, केळी हे खावेत. त्याशिवाय या लोकांनी भरपूर पाणी पिण्याने उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
वृषभ (Taurus)
तेल, तूप सौम्य, कमी साखर, कोबी, मुळा, काकडी, कांदा, भोपळा आहारात असावा. भरपूर पाणी प्यावी. थोडे गरम पाणी आरोग्यास चांगल आहे.आयोडिनयुक्त मीठ असलेले पदार्थ खावेत.
मिथुन (Gemini)
हिरव्या पाले भाज्या, वाटाणा, घेवडा, टोमॅटो, गाजर, बदाम, शेंगदाणे, हिरवी द्राक्ष, दूध, थंड ताक हे पदार्थ तुमच्यासाठी योग्य आहेत.
कर्क (Cancer)
दूध, दही, ताज्या भाज्या, भेंडी, सॅलड, फळे, प्रोटिनयुक्त आहार असावा. तर मीठ आणि तेलकट पदार्थ कमी खावेत.
सिंह (Leo)
खोबरे, गव्हाचे पदार्थ, पनीर, ताजे फळ, लिंबू, पनीर, तूप, दही, दूध आहारात असावे.
कन्या (Virgo)
बदाम, पनीर, पपई, कलिंगड, अंजीर, दही यांचा समावेश असावा. तर मसालेदार पदार्थ टाळावे.
तूळ (Libra)
गाजर, पालक, मुळा, टोमॅटो, चारोळे, बदाम, स्ट्रॉबेरी हे पदार्थ जरूर आहारात असावे.
वृश्चिक (Scorpio)
दूध, दही, तूप, कोबी, मुळा, कांदा, टोमॅटो, खोबरे, गूळ, ताजी फळे आरोग्यास फायदेशीर आहेत.
धनु (Sagittarius)
सॅलाड, हिरव्या पाले भाज्या, अंजीर, केळी, बटाटा, पनीर क्रीम, लोणी, हरभरा डाळ हे पदार्थ तुमच्यासाठी योग्य आहेत.
मकर (Capricorn)
संत्री, लिंबू, अंजीर, फ्लॉवर, पालक, खोबरे, अक्रोड, दुध, तूप यांच्या आहारात समावेश करा. तर साखरेचं प्रमाण कमी असावं.
कुंभ (Aquarius)
पालक, मुळा, फ्लॉवर, लिंबू, बीट, गाजर, काकडी, केळी, आंबा हे पदार्थ तुमच्यासाठी फायदेशीर आहेत.
मीन (Pisces)
कांदा, मुळा, पालक, सफरचंद, द्राक्षे, संत्री, कमी साखर, गूळ, कडधान्य, हरभरा डाळ या पदार्थ्यांचा आहारात समावेश करा.
हेसुद्धा वाचा - Weekly Money Horoscope : 'या' लोकांना होणार मोठा आर्थिक लाभ, पाहा तुमचे भविष्य
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)