Hindu Calendar 2023: नववर्ष 2023 सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. नवं वर्षानिमित्त नवे संकल्प आखले गेले आहेत. मात्र असं असताना ग्रह ताऱ्यांची साथ मिळणार का? याकडेही लक्ष लागून आहे. दुसरीकडे 2023 या वर्षात काही दुर्लभ योग जुळून आले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार हे वर्ष खूप महत्त्वाचं असणार आहे. 19 वर्षानंतर 2023 मध्ये श्रावण हा अधिक मास असणार आहे. म्हणजेच श्रावण दोन महिने असणार आहे. त्यामुळे भगवान शिवशंकराची कृपा मिळवण्याची संधी आहे. 2023 मध्ये अधिक मास 18 जुलैपासून सुरु होईल आणि 16 ऑगस्टपर्यंत असणार आहे. या कालावधीला पुरुषोत्तम/मल/अधिक श्रावण मास संबोधलं जातं. तसं पाहिलं तर अधिक मास भगवान विष्णुंना समर्पित आहे. या कालावधीत भगवान विष्णुंची आराधना केली जाते. पण श्रावण मास असल्याने शिवांची पूजा करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी मिळेल.


अधिक मास का लागतो?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्य वर्ष 365 दिवस आणि 6 तासांचं असतं. तर चंद्र वर्षे 354 दिवसांचं असतं. सूर्य वर्ष आणि चंद्रवर्षात 11 दिवसांचं अंतर असतं. हे अंतर कमी करण्यासाठी प्रत्येक तीन वर्षांनी एक अधिक मास असतो. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक तीन वर्षात एक अधिक मास असतो. 


बातमी वाचा- नववर्ष 2023 मध्ये शनि-सूर्य एकाच राशीत येणार, युतीच्या या राशींवर होईल परिणाम


अधिक मासात या बाबी लक्षात ठेवा


अधिक मास हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णुची पूजा केली जाते. त्यामुळे अधिक मासाला पुरुषोत्तम मास संबोधलं जातं. या महिन्यात पूजा पाठ केल्याने तिप्पटीनं फळ मिळतं. पण काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.


- अधिक मासासत विवाह करू नये. या महिन्यात विवाह करणे अशुभ मानलं जातं. या महिन्यात विवाह केल्यास शारीरिक-मानसिक सुख मिळत नाही. जीवन निरागस होतं.


- अधिक मासात नव्या कामाची सुरुवात करु नये. अन्यथा धनहानी होण्याची शक्यता असते. कामात यश मिळत नाही.


- अधिक मासात गुंतवणूक करू नये. प्रॉपर्टी दागिने खरेदीसाठी नवरात्रीपर्यंत वाट पाहावी. अधिक मासात घर बांधू नये.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)