Holi 2023 Horoscope : फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो (Holi 2023). यंदा होलिका दहन ७ मार्चला होणार आहे. तर ८ मार्चला रंगपंचमी आहे. होळी सणाचे पंचागाच्या अनुषंगानेही विशेष महत्व आहे. यंदा तब्बल 30 वर्षानंतर होळीला शनि-गुरूचा अद्भुत संयोग जुळून येणार आहे. वृषभ (Taurus), मिथुन (Gemini), वृश्चिक (Scorpio) आणि कुंभ (Aquarius) या चार राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषांच्या मते यंदा होळीचा सण अधिक विशेष आहे. होळीच्या निमित्ताने 30 वर्षांनंतर शनी स्वराशी कुंभ राशीत आणि 12 वर्षानंतर गुरु बृहस्पति स्वराशी मीन राशीत विराजमान होणार आहे. याशिवाय कुंभ राशीमध्ये त्रिग्रही योग जुळून येणार आहे. 
कुंभ राशीत शनि, सूर्य आणि बुध त्रिग्रही योग तयार होईल. 30 वर्षांनंतर होळीच्या दिवशी ग्रहांची अशी स्थिती निर्माण झाली आहे. या दुर्मिळ योगायोगामुळे चार राशींचे भाग्य उजळणार आहे.


वृषभ (Taurus)


होळीच्या निमित्ताने ग्रहामध्ये तयार होत असलेला हा शुभ योग वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभदायी ठरणार आहे. नोकरदारांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीत संधी मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांनाही फायदा होईल. जे लोक दीर्घकाळ गुंतवणुकीचा विचार करत असतील त्यांच्यासाठीही काळ अनुकूल आहे. पद आणि प्रतिष्ठा वाढेल.  समाजात मान-सन्मान वाढेल.


मिथुन (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगला काळ येणार आहे. जे काम हाती घ्याल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. परदेशात राहण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. व्यवसाय करणारे आपले कार्यक्षेत्र वाढवू शकतात. अचानक धनलाभ होऊ शकतो.  मन उपासनेत गुंतलेले असेल. तुमची देवावरील श्रद्धा वाढेल. धर्मादाय कार्य करून तुम्हाला अधिक लाभ मिळेल.


वृश्चिक (Scorpio) 


शनि, सूर्य आणि बुध यांचा त्रिग्रही योग या राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. वाहन आणि  घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. वाहन आणि प्रॉपर्टीशी संबधीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. जे लोक दीर्घकाळापासून आर्थिक संकटाचा सामना करत होते, त्यांच्या समस्याही लवकरच संपुष्टात येऊ शकतात. करिअर-व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील.


कुंभ (Aquarius)


सूर्य, शनि आणि बुध हा त्रिग्रही  दुर्मिळ योग कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ मानला जात आहे. कुंभ राशीच्या लोकांना धनप्राप्तीच्या संधी मिळतील असे ज्योतिषी सांगतात. शैक्षणिक क्षेत्रात विशेष कामगिरी करता येईल. करिअर-व्यवसायात हळूहळू सुधारणा होईल. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहणार आहे.