Shani Uday in Holi 2023: मार्च महिन्यातील पहिला सण तो म्हणजे होळी आणि धुलिवंदन. यावर्षी होळीचा सण 8 मार्च रोजी आहे. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 7 मार्चला होलिका दहन (Holika Dahan 2023) होणार आहे. होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशीच होईल. फाल्गुन पौर्णिमेच्या सकाळी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दानधर्म करतात त्यामुळे पुण्य मिळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

6 मार्चला रात्री 11.36 वाजता शनिदेव कुंभ राशी उगवेल. शनीच्या उदयामुळे अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात शुभ प्रभाव दिसू शकतो तर काही राशीच्या अडचणीत वाढ होऊ शकते. त्यामुळे 6 मार्चनंतर या लोकांनी खूप काळजी घ्यावी लागेल. शनिदेवाला न्याय देवता आणि कर्मफलदाता म्हणूनही ओळखले जाते.


वाचा: पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? तपासा आजचे दर


या राशींवर विशेष प्रभाव


तूळ -  कुंभ राशीत शनिच्या उदयामुळे तूळ राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. तर शनि उदय मुळे या राशीच्या लोकांना नोकरीत लाभ मिळू शकतो. दुसरीकडे तूळ राशीच्या लोकांना या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल.


सिंह - या राशीच्या लोकांना शनीच्या उदयाचे विशेष लाभ होणार आहे.  या काळात तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळू शकते. तसेच पैसे कुठे अडकले असतील तर या काळात परत मिळू शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्या. निष्काळजीपणामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. 


कुंभ - शनिदेव 5 मार्च रोजी त्याच राशीत उदय होणार आहे. अशा परिस्थितीत मित्र आणि नातेवाईकांचे विशेष सहकार्य मिळेल. खर्चात वाढ होईल आणि उत्पन्नाचे स्त्रोतही वाढतील आणि पैशाची आवक वाढेल. 


या राशींच्या अडचणीत वाढ


मेष - तुम्ही जर गुंतवणूकीचा विचार करत असाल तर थोडे थांबा.. कारण तुमच्यासाठी ही वेळ योग्य नाही... तसेच खर्च करताना जरा सांभाळून करा. कारण पैशांची अडचण निर्माण होऊ शकते. 


कन्या -  या राशींच्या लोकांनी पैशाच्या व्यवहारत विशेष काळजी घ्यावी. तुमचे रहस्य लोकांना अजिबात सांगू नका. तसेच वैवाहिक जीवनातही अडचणी येऊ शकतात. 


वृश्चिक - वैवाहिक जीवनात तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकत. पती-पत्नीमधील मतभेद वाढू शकतात. व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल नाही. 


मकर - या राशींच्या  लोकांची प्रकृतीच्या दृष्टीनेही काळ चांगला दिसत नाही. नोकरी- व्यवसायाच्या चांगल्या ऑफर तुमच्या ऑफर हातातून बाहेर पडू शकतात. 


मीन- या राशींच्या लोकांनी पैशाची उधळपट्टी करू नये. अनावश्यक गोष्टींवर होणारा खर्च तुमचे घर खर्चावर दिसून येईल. तसेच या राशीच्या लोकांनी सावधगिरी वाहतूक चालवावी. 


 


 



(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)