Holi 2024 Date : यंदा होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी कधी आहे? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Holi 2024 : हिंदू धर्मात होळी सणाला विशेष महत्त्व आहे. देशभरात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारे होळीचा सण साजरा करण्यात येतो. होळीचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजयाचं प्रतिक मानला जातो. यावर्षी होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीचा सण कधी आहे जाणून घ्या.
Holi 2024 Date : बुरा ना मानो होली है...रंगांचा हा उत्सव भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. रंगांचा हा उत्सव एक प्राचीन हिंदू उत्सव आहे. होळीचा सण हा दानव राजा हिरण्यकश्यपू, विष्णूभक्त प्रल्हाद आणि राक्षसी होलिका यांच्याशी जुळलेला आहे. फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळीचा सण साजरा करण्यात येतो. महाशिवरात्रीनंतर वेध लागतात ते होळी सण असून या सणाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. (holi 2024 Date when is holika dahan dhuliwandan and ranga panchami date time and shubha muhurat in marathi)
यंदा होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी कधी आहे?
पंचांगानुसार यंदा (Holika Dahan Tithi 2024) फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 24 मार्च 2024 सकाळी 9.57 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 25 मार्च 2024 ला दुपारी 12:32 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार होलिका (holika dahan date) दहन 24 मार्च 2024 ला असणार आहे.
होलिका दहन शुभ मुहूर्त - 24 मार्च 2024 - रात्री 11.31 वाजेपासून रात्री 12.27 वाजेपर्यंत
तर होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरा करण्यात येतो. या दिवशी रंगांची मुक्त उधळण केली जाते. धुलिवंदन 25 मार्च 2024 ला असणार आहे. तर महाराष्ट्रात काही भागात रंगपंचमीला रंगांचा खेळ खेळला जातो. यावर्षी रंगपंचमी 30 मार्च 2024 ला साजरी करण्यात येणार आहे.
होलिका दहन मंत्र (Holika Dahan Mantra In marathi)
होलिका दहनाच्या दिवशी ‘ॐ त्र्यंबकम यजमाहे सुगंधीं पुष्टीवर्धनम्’. ‘उर्वारुकमिव बंधनं मृत्युोर्मक्षिय ममृतात्’ या मंत्राचा जप करावा. या शिवाय होलिका दहनावेळी गायत्री मातेचा महामंत्र ‘ॐ भुर्भुव: स्वा: तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात’ या मंत्राचाही जप करावा.
होळीसंदर्भात आख्यायिका (Holi Information In Marathi)
होळीचा सण हा दानव राजा हिरण्यकश्यपू, विष्णुभक्त प्रल्हाद आणि राक्षसी होलिका यांच्याशी जोडला गेला आहे. पुराणात अशी आख्यायिका आहे की, एकेकाळी हिरण्यकश्यपू नावाचा राजा पृथ्वीवर राज्य करायचा. तो भगवान विष्णूंचा कट्टर विरोधक होता, असं म्हटलं गेलं आहे. पण, त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूंची भक्ती करायचा. तो रात्रंदिवस विष्णुची पूजा करायचा. मुलगा विष्णूभक्त असल्यामुळे हिरण्यकश्यपू त्रस्त झाला. त्याने अनेकदा प्रल्हादला मारण्याचा प्रयत्नही केला. पण प्रत्येक वेळी तो अयशस्वी होत असे. एकदा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्याची जबाबदारी आपली बहीण होलिकेला दिली. होलिकेनी प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्याचे आदेश हिरण्यकश्यपूने देण्यात आले. होलिकाला अग्नीत बसून काहीही होणार नाही असं वरदान देण्यात आलं होतं. पण भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हादाला काही झालं नाही, पण होलिका आगीच्या ज्वाळांमध्ये भस्म झाली. तेव्हापासून होलिका दहन हा दिवस चांगल्याचा वाईटावर विजय साजरा करण्यात येतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)