Holi Chandra Grahan 2024 Date : होळीला चंद्रग्रहण असल्याने सण साजरा करता येणार का? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त
Chandra Grahan on Holi 2024 : होळीला चंद्रग्रहण आल्यामुळे हा सण साजरा करायचा की नाही असा संभ्रम सर्वसामान्यांना पडला आहे. शास्त्र काय सांगतं जाणून घेऊयात.
Chandra Grahan on Holi 2024 : मार्च महिना म्हटलं की वेध लागतात हे होळीचे...लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना होळीचे वेगवेगळे रंग खूप आवडतात. होळीचे रंग जणू आपल्या आयुष्यात सप्तरंगी गोष्टी घेऊन येतात. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होळी येणार आहे. यावर्षी होळीचा हा सण 25 मार्च 2024 ला साजरा करण्यात येणार आहे. होळीच्या दिवशी 25 मार्च 2024 ला या वर्षांतील चंद्रग्रहण असणार आहे. धार्मिक शास्त्रानुसार ग्रहण हे शुभ मानलं जातं नाही. ग्रहण काळात शुभ कार्य केले जातात नाही. अशात होळीचा सण साजरा करायचा का असा संभ्रम सर्वसामन्यांमध्ये आहे. (Holi Chandra Grahan 2024 Date Can Holi be celebrated due to lunar eclipse Know the date and muhurt)
'या' वर्षातील पहिलं चंद्रग्रहण होळीच्या दिवशी!
हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला म्हणजे 25 मार्च 2024 ला चंद्रग्रहण असणार आहे. चंद्रग्रहणाची वेळ ही सकाळी 10.23 वाजेपासून दुपारी 3.02 वाजेपर्यंत असणार आहे. या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे भारतात दिसणार नाही आहे. त्यामुळे भारतीयांनी सुतक काळ पाळला नाही तरी चालणार आहे. त्याशिवाय चंद्रग्रहणाचा होळी सणावरही परिणाम होणार नाही, असं धार्मिक शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
होळीच्या आधल्या दिवशी धुलिवंदन सण साजरा करण्यात येतो. धुलिवंदन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला असणार आहे. पंचांगानुसार या वर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 24 मार्चला सकाळी 9.54 वाजेपासून 25 मार्चला दुपारी 12.29 वाजेपर्यंत असणार आहे. याचा अर्थ 24 मार्चला धुलिवंदन म्हणजे होळीचं दहन करण्यात येणार आहे.
धुलिवंदनाचा शुभ मुहूर्त - 24 मार्चला रात्री 11.13 ते 12.27 पर्यंत होळी दहनाचा शुभ मुहूर्त असणार आहे.
2024 वर्षांतील पहिलं चंद्रग्रहण कोठं दिसणार आहे?
वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे भारतातील पेनम्ब्रल चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात नाही पण उत्तर आणि पूर्व आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक आणि अंटार्क्टिकाच्या बहुतांश भागात पाहू शकणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)