Holika Dahan 2023 Ashes: होळी (Holi).... शिमगा (Shimga) किंवा हौली (Hauli)....या सणाला प्रांत तशी नावं. देशाच्या प्रत्येक भागात थोड्याफार फरकानं हा सण साजरा होतो. त्यामागचा हेतू मात्र एकच असतो. अशा या होलिकेचं दहन करताना त्याभोवती सहसा पुरुष मंडळी फेर धरतात, गाणी म्हणतात, गाऱ्हाणी घालतात आणि त्यानंतर आरोळी, बोंबा ठोकत होलिका दहन करतात. यानंतर लगबग असते ती म्हणजे या धगधगत्या होळीत नारळ टाकण्याची, तिची राख उचलण्याची. पण, ही राख नेमकी काय उचलतात, टीळा म्हणून ती कपाळी का लावतात... माहितीये? 


राख म्हणजे साक्षात लक्ष्मीचा आशीर्वाद 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं म्हणतात की शनीची महादशा असो किंवा मग राहू केतुची पिडा, मूठभर होळीची राख शिवलिंगावर लावल्यास या अडचणी दूर होतात. वैवाहिक आयुष्यात आनंदाची उधळण होते. नोकरीमध्ये येणारे अडथळे दूर होतात. 


हेसुद्धा वाचा : Weekly Love Horoscope :'या' राशींचं लव्ह लाइफ असणार रोमँटिक आणि रंगीबेरंगी, होळीच्या हा आठवड्याचं राशीभविष्य जाणून घ्या


होळीची राख आणि तांब्याची सात नाणी एका लाल रंगाच्या कापडात बांधून तिजोरीत ठेवल्यास घरात धनधान्य संपत्ती नांदते असं म्हणतात. आर्थिक वृद्धीसाठी ही राख म्हणजे जणू वरदान. इतकंच नव्हे, तर घरावर असणाऱ्या वाईट प्रवृत्तींच्या नजरा दूर पळवून लावण्यासाठीसुद्धा ही राख फायद्याची. यासाठी होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास राख आणा आणि यामध्ये मीठ, राई मिसळून ती घरातील गुप्त स्थानी ठेवा. 


अशीही धारणा आहे, की जी मंडळी सतत आजारी असतात त्यांनी साधारण महिनाभर (होलिका दहनापासून एक महिना) कपाळावर ही राख टीळा म्हणून लावावी. याचे परिणाम लगेचच दिसू लागतील. नवग्रहांच्या दुष्परिणामांना टाळण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात होळीची राख मिसळावी. यामुळं आर्थिक आणि शारीरिक फायदा होतो. 


इतकंच नव्हे, तर घरात सुखशांती नांदत नसेल, तर होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे, थोडी राख घराच्या कोपऱ्यात उडवा. हा उपाय सकाळच्याच वेळेत करा. एक बाब लक्षात ठेवा की इतर कुणी हे पाहणार नाही. यामुळं गृहक्लेश दूर होण्यासोबतच घरातील सदस्यांमध्ये असणारे मतभेदही दूर होतील.