आजचे राशीभविष्य | ४ जानेवारी २०२० | `या` राशीतील व्यक्तींना धनलाभ होण्याचा योग
असा असेल तुमचा आजचा दिवस
मेष : आज दिवसभर तुम्ही व्यस्त असाल. गंभीर समस्या सोडवण्यासाठी हा चांगला वेळ नाही. तुमच्याकडे जे आहे त्यावर लक्ष द्या. कोणता मोठा निर्णय घ्यायचा असेल तर विश्वासातल्या माणसांचाच सल्ला घ्या. सल्ला उपयोगात येईल. तुमच्या बोलण्याच्या पद्धतीवरुन दुसरे लोक तुमच्या बाजूने येतील. कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी चांगले वातावरण बनेल.
वृषभ : आपले विचार नव्या विचारांसाठी खुले करा. केलेली कामे पुन्हा एकदा बघा. दबाव किंवा तणाव कमी होऊ शकतो. पैसे गुंतवणूक किंवा घेण्यादेण्याचे योग येऊ शकतात. कोणते तरी काम समोर आणण्याचा विचार करु शकता. संबंधाचा फायदा मिळण्याचा योग आहे. व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतूक करतील. पती पत्नीचे संबध अधिक दृढ होतील.
मिथुन : तुमच्या नियंत्रणाबाहेर गेलेली कामं आज तुमच्या नियंत्रणात येऊ शकतील. पैसा कमावण्याच्या मोठ्या संधी आपल्याला मिळतील. पैशांच्या बाबतीत मोठे यश मिळण्याचा योग आहे. वेळेचे नियोजन केलात तर सर्व कामे व्यवस्थित होतील. त्यासंदर्भातील मोठी संधी तुम्हाला मिळेल. आज तुम्ही त्याचा पूर्ण फायदा उठवाल. कामाचे ठिकाण आणि व्यवसायात नम्रतेने वागण्याने तुम्ही पुढे जाऊ शकता. दुरून कुठूनतरी चांगली बातमी येऊ शकते. तुम्हाला काही जबाबदारीही मिळू शकते. आत्मविश्वासात वाढ होईल.
कर्क : मित्र किंवा नातेवाईकांना तुमची कमी जाणवेल. कोणत्या तरी क्षणी चांगल्या ओळखी आणि काही प्रमाणात धन लाभ देखील होऊ शकेल. तुम्ही काही नाती मजबूत करण्याचा प्रयत्न कराल. स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्नही तुम्ही कराल. काही महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण होण्याचा योग आहे. आज सुरू केलेल्या कामांप्रती तुम्ही गंभीर आणि जबाबदार असाल.
सिंह : मोठी योजना पूर्ण करण्याचे प्लानिंग कराल. ऑफिसमध्ये तुम्हाला जबाबदारीचे काम मिळेल. टीम म्हणून हे काम पूर्ण केल्यास तुम्हाला फायदा मिळेल. अशा काही माणसांशी मुलाखत होईल ज्यांची भविष्यात तुम्हाला मदत होईल. तुम्ही ठरवलेली कामे सहज पूर्ण होतील. आईचं सुख मिळेल. आज नव्या वर्षाची रुपरेखा बनवालं. व्यवसाय वाढू शकतो. जोडीदारासोबत भेट होण्याचे योग आहेत.
कन्या : धन लाभ होण्याचा योग आहे. पगारात वाढ होऊ शकते. कर्ज चुकते करता येऊ शकते. पैशांशी जोडल्या गेलेल्या प्रकरणात तुमच्या विचारात बदल होऊ शकतो. मेहनतीने धन लाभ होऊ शकतो. लोकांना भेटणे आणि त्यांच्याशी बोलणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते. अडकलेला पैसा परत मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. नव्या जबाबदारी मिळण्याचे योग आहेत.
तुळ : कोणते तरी मोठे काम तुम्हाला एकट्यालाच करावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. कोणत्यातरी समस्येचे निराकारण देखील आज होईल. परिवारासोबत वेळ घालवण्याचा आनंद मिळेल. पैंशाप्रकरणी तणाव कमी होऊ शकतो. नव्या व्यवसायाची सुरूवात होण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने असतील.
वृश्चिक : ज्यांच्याकडून तुम्हाला कधीच अपेक्षा नव्हती अशी सोबत काम करणारी मंडळी तुम्हाला मदत करतील. त्यांच्याशी चर्चा होण्याचा योग आहे. सकारात्मक दिशेने पाऊल टाकण्याचा प्रयत्न कराल. पैशांचे कोणतेतरी जुने प्रकरण मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल. अभ्यासात देखील लक्ष लागेल. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. संयम ठेवा.
धनु : संबंधांमध्ये सुधार होऊ शकतात. सर्वांचा आदर ठेवा. तुमच्या निर्णयात स्पष्टपणा असेल. विवाहास योग्य व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव मिळतील. नोकरी किंवा व्यवसायांवर बोलणाऱ्यांसाठी चांगली वेळ आहे. जोडीदारासोबत सुरू असलेला तणाव मिटण्याची शक्यता आहे. कोणताही मोठा निर्णय घेताना सहकाऱ्यांची मदत घ्या.
मकर : नोकरी किंवा व्यवसायासंदर्भात काही नव्या योजना आखू शकता. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू शकाल. व्यवसायात यश आणण्यासाठी तुम्हाला जोर देऊन काम करण्याची गरज आहे. कामामध्ये सहकाऱ्यांची मदत होईल. कोणती चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. नोकरीमध्ये नवे काम मिळण्याचे योग आहेत. कमावण्याचे नवे मार्ग समोर येतील.
कुंभ : वायफळ काम करण्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करुन आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. तुम्ही तुमच्या विचारात थोडा बदल करु शकता. पैसा कमावण्याच्या नव्या संधी समोर येतील. पैशांमुळे तुमची मोठी समस्या सुटण्याचा योग आहे. व्यवसायात मोठा फायदा मिळेल. मित्रांची मदत मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी कराल.
मीन : आज तुमची जबाबदारी वाढेल. नोकरीमध्ये सर्व गोष्टी ठिक ठेवण्यासाठी नेहमीच्या कामापेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करावा लागेल. यामुळे येणाऱ्या दिवसांत तुम्हाला फायदा होऊ शकतो. दुकान किंवा नव्या वाहनाचा फायदा मिळू शकतो. व्यवसायासाठी नव्या लोकांशी संपर्क होतील. वैवाहीक जीवनात आनंद मिळेल. तुमच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे तुम्ही हवे ते मिळवू शकता.