मुंबई : वर्षाचे पहिले छायाकल्प चंद्रग्रहण आज पौष शाकंभरी पौर्णिमेच्या रात्री होणार असून ते संपूर्ण भारतातून दिसणार आहे. ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेमध्ये येते त्यावेळी छायाकल्प म्हणजेच मांद्य चंद्रग्रहण दिसणार आहे. या चंद्रग्रहणाच्या 12 राशींवर काय परिणाम होतो ते पाहूया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष - पैशाच्या बचतीकरता आज नवीन योजना समोर येईल. आज काही निर्णय तुमच्याबाजूने घडू शकते. आजचा दिवस व्यस्त असेल. जवळच्या व्यक्तीशी संबंधीत काही नवीन गोष्टी कळतील. कामात नक्की सुधारणा करा. आज सगळी काम वेळेत पूर्ण होतील. 


वृषभ - पैशांबाबत कोणतेही निर्णय घेताना सावधपणे घ्या. आजचा दिवस तुमचा आहे. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. पार्टनरसोबत चांगला वेळ घालवाल. काहीही नवीन करण्यापूर्वी पार्टनरशी संवाद साधा. आज अर्धवट राहिलेली सर्व काम पूर्ण होतील. 


मिथुन - आज एकाच दिवशी अनेक योजना बनवाल. स्वतःवर संयम ठेवण्याची गरज आहे. कामात नवीन सुरूवात कराल याचा फायदा तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीत होईल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आजचा दिवस तुमचा आहे. आरोग्याची काळजी घ्याल. 


कर्क - स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा. बिझनेस, पैसे आणि कायद्यात जोडलेल्या गोष्टींमध्ये आजचा दिवस जाईल. नवीन मित्र बनतील ज्यांचा भविष्यात खूप फायदा होईल. अनेक कामात सक्रिय राहाल आणि यशस्वी देखील व्हाल. जुन्या गोष्टी आज फायद्याच्या ठरतील. कुटुंबासोबत आज वेळ घालवाल. 


सिंह - आजचा दिनक्रम लक्षात ठेवून फॉलो करा. दिवस घाईगडबडीचा आहे. त्यामुळे काम विसरण्याची वेळ येईल. एखादं महत्वाचं पद आज तुमच्याकडे येऊ शकतं. कामात आपली छाप सोडाल त्यामुळे यश मिळेल, कौतुक होईल. 


कन्या - उदासीनतेमधून आज बाहेर निघण्यास तुम्हाला मदत होईल. नवीन मित्रपरिवाराशी जोडले जाल. पुढे जाण्याच्या प्रयत्नात असल्यामुळे कुटुंबाकडून चांगलाच पाठिंबा मिळेल. दिवस आज थोडा तणावाचा असला तरीही तुमच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून खास असणार आहे. 


तूळ - नवीन जबाबदारी मिळू शकते. मेहनतीचं फळ आज तुमच्या पदरी पडेल. कामातून समोरच्या व्यक्तीचं लक्ष वेधू शकता. याचा फायदा नोकरी प्रमोशनकरता तर व्यवसायात नवीन गोष्टी मिळवण्यासाठी होईल. आज कुटुंबाशी संबंधीत नविन निर्णय घेऊ शकता. तो कुणासाठी चांगला तर कुणासाठी थोडा त्रासदायक असेल. 


वृश्चिक - आज सर्वाधिक काम सहज पूर्ण होताना दिसतील. योजना आखूनच काम पूर्ण करावे लागतील. कारण काम जास्त आणि वेळ कमी असं नियोजन करणं अत्यंत महत्वाचं असेल. ज्या खास संधीची वेळ पाहत आहात ती संधी आज मिळू शकते. 


धनू - आज जवळच्या मित्रासोबत कामात पार्टनरशिप कराल. दुसऱ्यांच्या माध्यमातून कामात मदत होईल याचा खूप फायदा होईल. पार्टनरकडून खूप चांगली साथ मिळाल्यामुळे आजचा दिवस उत्तम राहील. यामुळे आजचा दिवस समाधानाचा असेल. 


मकर - अनेक योजना मनात आखत असाल पण आज त्या कृतीतून व्यक्त करण्याचा दिवस आहे. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे दिवस कामाचा, ताण-तणावाचा असेल. अविवाहित असाल तर त्या बाजूने गोष्टी पुढे सरकतील. लग्नबंधनाचा योग आहे. 


कुंभ - आजचा दिवस महत्वाचा आहे. आजच्या दिवसात काही महत्वाचे ठाम निर्णय घ्यावे लागतील. लोकांकडून कामात मदत मिळेल. मित्र परिवाराशी गाठीभेटी होतील त्यामुळे दिवस उत्साहात असेल. पालकांच्या तब्बेतीची काळजी घ्याल. 


मीन - आजचा दिवस तुमचा आहे. प्रचंड मेहनत आणि उत्साहाने आजचा दिवस भरलेला आहे. धैर्याने साऱ्या गोष्टी करा. पण कुणाबद्दलही मनात कटूता आणू नको. माणूस कायमच चांगला असतो पण परिस्थिती त्याला तसं वागण्यास भाग पाडत असते. त्यामुळे संयमाने आजचा दिवस घालवा.