मुंबई : शनिवारी मिथुन राशीच्या लोकांची संथ सुरुवात होईल. तुळ राशीच्या लोकांची कामात निराशा होऊ शकते. तर कर्क, सिंह, मकर आणि कुंभ राशीसाठी शनिवारी आनंदाची बातमी मिळेल. शनिवारचा (Horoscope 13 November 2021) दिवस कसा असेल, जाणून घेऊयात एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून. (Horoscope 13 November 2021 Be alert if you are working from home know your astrology prediction)   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries) : इतरांना व्यक्त होण्यापासून रोखू नका. गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील रहा. साहित्यिकांना गूड न्यूज मिळू शकते. वेळेचा सदुपयोग करा. वाईट संगतीपासून दूर रहा. तरुणांनी आई-वडिलांनी सांगितलेल्या गोष्टींच पालण करावं.
    
वृषभ (Taurus) : काही सवयींमध्ये बदल केल्यास दिवस चांगला जाईल. जुन्या गुंतवणूकीतून मिळालेल्या रक्कमेमुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तरुणांसाठी दिवस मस्तीत जाईल. देवाच्या आराधनेत मन रमेल. गृहस्थ जीवनात प्रेम आणि समजुतदारपणासह प्रेमही असेल.    


मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या लोकांची संथ सुरुवात होईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या प्रयत्नांमुळे ओळख मिळेल. आर्थिक व्यवहार करताना सावध रहा.    


कर्क (Cancer) : तुमचं नशिब जोरात असेल. उत्पन्नात वाढ झाल्याने आर्थिक स्थिती स्थिर होईल. अचानक येणाऱ्या कामामुळे ठरवलेल्या कामात बदल होईल. जोडीदाराला भेट देण्याचं वचन देऊ शकता.    


सिंह (Leo) : शनिवारचा दिवस आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येणार आहे. बुद्धीच्या जोरावर केलेली कामं पूर्ण होतील. व्यापारात वाढ करण्याबाबत कुटुंबियांसोबत चर्चा करा. सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहिल.    


कन्या (Virgo) : स्वत:ला नव्या बदलासाठी तयार ठेवा. वर्क टु होम करत असल्यास परिपक्वता दाखवा. तसेच कामात थोडे गंभीर व्हा. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. करियर संबंधीत असलेली समस्येत नाहीशी होईल. 


तुळ (Libra) : तुमची वाणी तुम्हाला मिळालेलं वरदान आहे. कापड व्यवसायिकांसाठी दिवस निराशाजनक असू शकतो. झटपट फायदा मिळवण्याच्या नादात चुकीच्या पद्धतीचा वापर करु नका. कौटुंबिक समस्यांचा समाधान होईल. महिला वर्ग घरातील स्वच्छतेच्या कामात व्यस्त राहतील.


वृश्चिक (Scorpio) : घरच्यांच्या आशा-अपेक्षा पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी टार्गेटवर लक्ष ठेवा. आर्थिक चणचणीपासून वाचण्यासाठी फालतू खर्चावर बंधनं घाला. 


धनु (Sagittarius) : दिवस आनंदात जाईल. मनात पैशांबाबत अनेक विचार येतील. व्यापरवाढीसाठी विविध पर्यायांबाबत विचार कराल. महागड्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी योग्य वेळ आहे. अधिकारी तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात.  


मकर (Capricorn) : तुम्हाला तुमच्यातील हुशारी दाखवून देण्याची संधी मिळेल. शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे संकेत मिळू शकतात. आर्थिक चणचणींचा सामना करत असल्यास काही बाबतीत दिलासा मिळेल.  


कुंभ (Aquarius) : स्वत:च्या विचारात बदल झालेला जाणवेल. उत्साहाने व्यवसातील काम पूर्ण कराल. जुन्या गुंतवणूकीतून चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे.


मीन (Pisces) : व्यसाय संदर्भातील कामं पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे. काही जणांसोबत भेट होईल, ज्यामुळे तुमचा फायदा होईल. वैवाहिक जीवनात गोडवा राहिल.