Horoscope 15 October 2021: शुक्रवारी 3 राशीच्या व्यक्तींनी ही चूक करू नका, नाहीतर होऊ शकतं नुकसान
दसऱ्याच्या दिवशी मेष राशीच्या लोकांसाठी विशेष योग आहे. वृषभ राशीच्या नोकरीत पदोन्नतीची शक्यता
मुंबई: दसऱ्याच्या दिवशी मेष राशीच्या लोकांसाठी विशेष योग आहे. वृषभ राशीच्या नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. शुक्रवारी या 3 राशींना रागाबाबत सतर्क राहावे लागेल. खगोल गुरु बेजन दारूवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून जाणून घेऊया 12 राशींसाठी शुक्रवार कसा असणार आहे.
मेष: शुक्रवारी भाग्य तुमच्यासोबत असेल. आनंदाचं वातावरण असणार आहे. पैशांसाठी हात आखडतील आणि गुंतवणूक वाढणार आहे.
वृषभ: नोकरीत यश मिळेल. प्रवास होईल आणि चांगला वेळ जाईल.
मिथुन: विद्यार्थी चांगली कामगिरी करतील. कोणालाही कर्ज देणे टाळा. व्यवसाय आणि पैशासाठी आजचा दिवस संमिश्र असेल. पोटाच्या समस्या जाणवतील. खाण्यापिण्याची थोडी काळजी घ्या.
कर्क: तुम्हाला सर्व कार्यांमध्ये यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल. तुमच्या जोडीदारासोबत महत्त्वाच्या गोष्टी शेअर करा.
सिंह: लोकांसोबत चर्चा होईल. कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होतील. वादविवादापासून दूर राहा. कामात यश मिळण्याची शक्यता आहे.
कन्या: आरोग्य चांगले राहील. तुम्हाला परदेश प्रवासाचा आनंद मिळेल. पैसे गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
तुळ: जास्त रागामुळे समस्या वाढेल. मानसिक शांतता मिळेल.
वृश्चिक: कुटुंब किंवा प्रियजनांसोबत चांगला वेळ जाईल. मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती समाधानकारक राहील.
धनु: आरोग्य चांगलं राहील. कामात यश मिळेल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. तुमच्यावर रागाचे वर्चस्व येऊ देऊ नका, तर दिवस चांगला जाईल.
मकर: नशीब तुमची साथ देईल. आनंदाची बातमी मिळेल. नशीब तुमच्या सोबत असणार आहे. कामात फायदेशीर परिस्थिती राहील.
कुंभ: सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. काळजीपूर्वक काम करा आणि वाद टाळा. पार्टनरला समजून घ्यावं लागणार आहे.
मीन: फिरण्याचा आनंद घेऊ शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य मिळेल. तुम्हाला थोडा त्रास सहन करावा लागेल.