मेष- कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. दिवस व्यग्र असेल. अचानक एखादं नवं आणि वाढीव काम हाती येण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- जुंना वाद मिटेल. समाज आणि कुटुंबाप्रती असणारी जबाबदारी पार पाडाल. अनेक विचार मनात घर करतील. मित्रांची मदतही मिळेल. 


मिथुन- धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनेक अशी कामं हाती येतील जी प्रदीर्घ काळासाठी तुमची साथ देणार आहेत. आजचा दिवस आनंददायी आहे. कुटुंबाला वेळ द्या. एखादी शुभवार्ता मिळणार आहे. 


कर्क- अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. अडकलेली कामंही मार्गी लागतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. इतरांच्य़ा समस्यांवर तुम्ही तोडगा काढाल. 


सिंह - आर्थिक परिस्थिती सुधारेल. महत्त्वाकांक्षा वाढलेली असेल. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याचा योग आहे.


कन्या- नोकरी आणि व्यवसायामध्ये एकादं नवं पाऊल उचलाल. जुनी कामं मार्गी लागतील. 


तुळ- विचाराधीन कामं पूर्ण होतील. मित्रांसमवेत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. नोकरी आणि व्यवसायात मोठा फायदा होणार आहे. 


वृश्चिक- तुमच्यासाठी आजचा दिवस खास आहे. समजुतदारपणे काम करा. दिवस शुभ असेल. नशीबाची साथ मिळेल. 


धनु- नोकरी आणि करिअरच्या दृष्टीनं दिवस चांगला आहे. बढतीचा योग आहे. आपल्या माणसांना भेटण्याची संधी मिळेल. अनेकजण तुमच्या मदतीसाठी तयार असतील. 


मकर- एखादं महत्त्वंपूर्ण काम हाती घ्याल. मेहनत करा फळ चांगलंच मिळणार आहे. अविवाहितांसाठी विवाहप्रस्ताव येतील. इतरांच्या पुढं जाण्याचा योग आहे. 


 


कुंभ- दिवसभर पैशांचाच विचार करत असाल. आरोग्याबाबतची चिंता कमी होईल. दैनंदिन कामं मार्गी लागतील. धनलाभ होण्याचा योग आहे. 


मीन- आजच्या दिवशी जे काम हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. कागदोपत्री काम पूर्ण करण्यावर भर द्या. प्रवासाचा योग आहे.