मेष- तुम्ही कोणा एका निर्णयाच्या प्रतिक्षेत असाल, तर संयम ठेवा. निर्णय तुमच्याच पक्षात येणार आहे. मेहनत करा, यश मिळणार आहे. कुटुंबासमवेत जास्त वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- तुमच्या बोलण्यानं इतरांवर प्रभाव पाडाल. विचार करण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो. मित्रांची वेळीच मदत होईल. कुटुंबाकडे लक्ष द्या. 


मिथुन- जास्तीची कामं आटोपण्याकडे लक्ष द्या. सकारात्मक राहा. जबाबदारी पार पाडण्याच यशस्वी व्हाल. 


कर्क- प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायात फायदा होणार आहे. विचाराधीन कामं पूर्ण होतील. आरोग्याची काळजी ध्या. 


सिंह- पैसे कमवण्याच्या प्रयत्नांना यश येणार आहे. जास्तीची कामं पूर्ण होतील. एखादी शुभवार्ता मिळेल. 


कन्या- आजचा दिवस शुभ आहे. एखाद्या नव्या मित्रासमवेत महत्त्वाच्या मुद्द्य़ावर चर्चा करण्याचा योग आहे. मानसिक स्थैर्य लाभेल. 


तुळ- परिस्थितीवर तुमचं निय़ंत्रण असेल. कामात मन रुळेल. अडकलेली कामं पूर्ण होतील. 


वृश्चिक- अनेक कामं अगदी सहजपणे पूर्ण होणार आहेत. जोडीदाराचं सहकार्य मिळेल. मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्यासमवेत असेल. 


धनु- बऱ्याच काळापासून ज्या कामांच्या विचारात होतात, ती पूर्णत्वास जातील. एखादी नवी बाब शिकण्याची संधी मिळेल. 


मकर- बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. प्रयत्न करा, यश मिळेल. एखादा मोठा आणि योग्य तो निर्णय घ्याल. दिवस शुभ आहे. 


 


कुंभ- तुमच्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. अडचणींतून स्वत:ला सावरा. वादांमध्ये अडकू नका. एखादी शुभवार्ता मिळेल. 


मीन- दैनंदिन कामं पूर्ण होणार आहेत. मित्रांची मदत मिळेल. कामाची पद्धत बदलण्याचा मोठा फायदा होणार आहे. आर्थिक फायद्याचा दिवस आहे.