COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : १२ राशीच्या लोकांनी आज आपल्या कामकाजाबाबत अतिशय गंभीरपणे विचार करा. जवळच्या व्यक्तीने दिलेल्या सल्ल्याचा विचार करावा. शिक्षण, व्यवसाय आणि नोकरी या तीन महत्वाच्या विषयावर अवलंबून असणाऱ्यांनी याचा थोडा विचार करा. आरोग्याची काळजी अत्यंत महत्वाची बाब आहे. 


मेष- व्यापार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला नाही. कोणालाही पैसे उधार देऊ नका. एखादी जुनी गोष्ट तुम्हाला सतावेल. कोणाशीही वाद, तंटा होऊ शकतो. मानसिक तणाव वाढेल. खाण्यापिण्यावर लक्ष द्या. 


वृषभ- विचाराधीन कामं पूर्ण होतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. विचार करण्याची पद्धत बदला. बेत आखण्याचा फायदा मिळेल. साथीदाराची साथ मिळेल. 


मिथुन- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्याची अधिक काळजी कराल. खाण्यापिण्याच्या बाबतीत सावध राहा. 


कर्क- कामाच्या ठिकाणी वातावरण चांगलं नसल्यामुळे मन चिंतीत राहील. प्रेमसंबंधांमध्ये तणाव असेल. प्रिस्पर्ध्यांपासून सावध राहा. 


सिंह- तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल. आज तुम्ही इतरांपासून अधिक प्रभावित असाल. तुमचा सल्ला अनेकांसाठी फायद्याचा असेल. सांधेदुखी बळावेल. 


कन्या- कुटुंबाची मदत मिळेल. मानसिक परिस्थिती संतुलित असेल ज्याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवा. आरोग्य उत्तम असेल. अडचणी दूर होतील. 


तुळ- तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. कामाच्या व्यापात बढती मिळण्याची संधी आहे. इतरांकडून काम करवून घ्याल. आजचा दिवस चांगला असेल. 


वृश्चिक - आर्थिक बाबतीत नुकसान होईल. काही कायदेशीर गोष्टींमध्ये अडकून राहाल. अचानक होणारी घटना तुम्हाला आनंद देऊन जाईल. सोबतच एखादी शुभवार्ता कळेल. 


धनु- शेअर बाजारात विचापूर्वक गुंतवणूक करा. वरिष्ठांसोबत थोडं सावधगिरीने बोला. एखादं खास काम पूर्ण होईल. दिवस शांततापूर्ण असेल. 


मकर - व्यवसायासाठी प्रवास होऊ शकतो. नवीन जबाबदारी मिळू शकते. नोकरीत प्रगती होईल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवाल. तब्येत चांगली राहील.


कुंभ - नोकरीत चांगली कामगिरी कराल. व्यवसायात फायदा होईल. मन प्रसन्न राहील. चांगली बातमी कानावर येऊ शकते. दिवस मनोरंजनात्मक राहील. तब्येतीची काळजी घ्या.


मीन - काम करण्याच्या पद्धतीत बदल करु शकता. कामात मन कमी लागेल. गोंधळ वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये वाद होऊ शकतो. तुमची मतं, परिस्थिती स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करा.