मेष - दृढ आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही अनेक कामे पार पाडू शकता. पैसा आणि व्यवसायावर अधिक लक्ष द्या. करियरमध्ये पुढे जाण्यासाठी अनेक संधी मिळतील. सामाजीक सन्मान वाढेल. आरेग्याकडे लक्ष द्या. खर्च वाढण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - दिवस व्यस्त स्वरूपाचा आहे. कही लोक तुमच्याकडून काम काढून घेण्याचा प्रयत्न करतील. कोणत्याही गोष्टीचा अधिक विचार करू नका. मनातली प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनसाथीजवळ व्यक्त करा. 


मिथुन - व्यवसायात आणि नोकरीच्या कामांमध्ये कुटुंबीयांकडून मदत मिळेल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. व्यवसायात अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. घरासाठी एखादी नवीन वस्तू खरेदी करू शकाल. आरेग्याकडे लक्ष द्या. खर्च वाढण्याची शक्यता आहे. 


कर्क - नव्या व्यवसायाच्या दिशेने कूच कराल. उत्पन्न वाढू शकतं. अनेक जुन्या योजना विचारात येवू शकतात. तुमच्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक करण्याची उमेद आहे. अधिक मेहनत करा यश अटळ आहे. 



सिंह - व्यवसाय वाढवण्यासाठी अनेक नव्या योजना विचारात येवू शकतात. अडकलेले पैसे पुन्हा मिळू शकतात. आज तुमचे प्रयत्नांना यश लाभेल. जीवनसाथीकडून सहयोग मिळेल. सर्व इच्छा पुर्ण होतील. अविवाहित लोकांसाठी दिवस चांगला आहे. विवाहाचे प्रस्ताव मिळण्याचे योग आहेत. 


कन्या - आज कोणत्याही प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत ठेवू नका. तुम्हाला वाटल्यास ती माहिती इतरांना सांगा. स्वतःहून कोणताही निर्णय घेवू नका. इतरांचा सल्ला घ्या. 


तूळ- नोकरीत एखादा सन्मान मिळेल. जोडीदाराकडून चांगले सहकार्य लाभेल. जमीनजुमल्याचे व्यवहार करणाऱ्यांना यश मिळेल. जबाबदारी घ्यावी लागेल. 


वृश्चिक-  कित्येक विचारांनी तुमच्या डोक्यात घोळ घातला आहे. कालांतराने सर्व गोष्टी मार्गी लागतील. फक्त योग्य वेळेचा विचार करा. लवकरच ती वेळ तुमच्या जीवनात येणार आहे. यश मिळवण्यासाठी प्रयत्न करत रहा.


धनु- तुम्हाला तुमचे निर्णय स्वतःला घ्यायला आवडतात आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. तुमच्यामध्ये क्षमतेपेक्षा अधिक करण्याची उमेद आहे. अधिक मेहनत करा यश अटळ आहे. आरोग्याची काळजी घ्या.   


मकर- आजचा दिवस खूप बिझी असेल. आज तुम्ही एखादे काम कोणत्याही परिस्थितीत पार पाडालच. कोर्टकचेरीचे एखादे प्रकरण उद्भवण्याची शक्यता. नातेवाईकांकडून फायदा होण्याची शक्यता. नोकरीच्या ठिकाणी इतरांवर प्रभाव पाडाल. काही न सुटणारे प्रश्न अचानक समोर येतील.


कुंभ- तुमच्या राशीसाठी आज चंद्राची स्थिती अनुकूल आहे. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. एखादी चांगली बातमी कानावर पडेल. नवीन प्रेमसंबंधांना सुरुवात होऊ शकते.  व्यवसायासाठी नव्या लोकांशी संपर्क होतील. 


मीन- अचानक धनलाभ होईल. आज कोणत्या गोष्टीचा विचार करत असाल तर धिर ठेवा आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. नवीन गोष्टी करण्यासाठी वरिष्ठांकडून सल्ला घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या.