मेष - नोकरीच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. दिवसभर व्यग्र असाल. व्यापाराच्या काही पेचांमध्ये अतिशय समजुतदारपणे निर्णय घ्याल. यश तुमच्याच प्रतिक्षेत आहे. अचानक एखादा बेत आखला जाऊ शकतो. अडचणींवर मात करण्यासाठी तयार राहा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- काळजी घ्या. सक्रियतेचा स्तर वाढलेला असेल. कुटुंबावर लक्ष द्या. अनेक कल्पनांनी तुमच्या डोक्यात घर केलेलं असेल. खर्च वाढेल. मित्रांची मदत मिळेल. 


मिथुन- धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनेक योजना आखू शकता. बुद्धिचातुर्यानं आज यश संपादन करण्याची संधी आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. 


कर्क- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. परिणामी आर्थिक अडचणी दूर होतील. व्यवहार कौशल्य ठेवा. अनेक अडचणींवर तोडगा निघणार आहे. 


सिंह- आर्थिक परिस्थितीमध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. महत्त्वाकांक्षा वाढलेली असेल. वरिष्ठांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठराल. मेहनत करा, फळ मिळेल. 


कन्या- नोकरीच्या ठिकाणी काही नवे उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घ्याल. साथीदारासमवेत काही क्षण व्यतीत करण्याची संधी मिळेल. कौटुंबीक अडचणींवर तोडगा काढाल. 


तुळ- विचाराधीन कामं पूर्ण होतील. फायदा होणार आहे. अचानकच सर्वकाही सुरळीत होईल. मित्रांसमवेत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याला प्राधान्य द्याल. उधार दिलेले पैसे परत मिळतील. 


वृश्चिक - तुमच्यासाठी आजचा दिवस खास असेल. काही अशा गोष्टींचा उलगडा होईल, ज्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. आजचा दिवस चांगला असेल. नशीबाची साथ मिळणार आहे. 


धनु- नोकरी, करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये आजचा दिवस चांगला आहे. तुमचा उत्साह परमोच्च शिखरावर असेल. आज काही नव्या व्यक्तींशी संपर्क साधण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुमच्या मदतीसाठी अनेकजण तयार असतील. 


मकर- एखादं महत्त्वपूर्ण काम पूर्णत्वास न्याल. दिवसभर पैशांचाच विचार करत असाल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी आहेत. पुढे जाण्यासाठी अनेक संधी तुमच्या प्रतिक्षेत आहेत. 


 


कुंभ- धैर्यानं पुढे जा. भूखंडाच्या व्यवहारांमध्ये फायदा होणार आहे. एखाद्या नव्या कामाचा विचार मनात येईल आणि तशी कामं करण्याची संधीही चालून येईल. दैनंदिन कामाचा व्याप वाढेल. आरोग्याची चिंता कमी होईल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील. 


मीन- आज तुम्ही जे काम कराल त्याचा फायदाच होणार आहे. आर्थिक स्थैर्याचाच विचार करत असाल. काही महत्त्वाचा कागदोपत्री व्यवहार करु शकता.