मुंबई : शनिवार वृषभ, कर्क आणि धनु राशीच्या लोकांसाठी अडचणीचा जाणार आहे. या तिन्ही राशीच्या लोकांनी दूरचा प्रवास टाळावा. तसेच मोठे निर्णय घेऊ नये. तुळ आणि वृश्चिक राशीचे प्रत्येक बाबतीत यशस्वी वाटचाल करतील आणि त्यांना चांगले निर्णय मिळतील. शनिवारचा दिवस कसा असेल, हे जाणून घेऊयात एस्ट्रो गुरु बेजान दारुवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून. (Horoscope 20 November 2021 For these 3 zodiac signs crisis on Saturday know your astrology zodiac prediction)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries) : तुमच्या चांगल्या कामगिरीमुळे इतर प्रभावित होतील. दररोजच्या कामांव्यतिरिक्त वेगळ काही करण्याचा प्रयत्न केल्यास यशस्वी व्हाल. व्यापाऱ्यांची निराशा होऊ शकते. नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस आरामदायी राहिल. 


वृषभ (Taurus) : कौटुंबिक जीवनात अस्थिरता येऊ शकते. आई-वडिलांसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. प्रेम संबंधासाठी योग्य वेळ आहे. नोकरदार वर्ग कठोर परिश्रमाने वरिष्ठांना संतुष्टच करु शकतात. 


मिथुन (Gemini) : राशीपैकी काही जणांसाठी लांबचा प्रवास हा आर्थिक आणि व्यावहारिक दृष्टीने फायदेशीर ठरेल.  तुमच्यासाठी हा सुखद अनुभव ठरेल. आत्मविश्वास आणि स्फूर्तिच्या जोरावर चांगला फायदा मिळवाल. पारिवारीक कलहामुळे कुटुंबातील सदस्य तुमच्या यशाबाबात आनंदी राहणार नाहीत.


कर्क (Cancer) : विविध स्तरावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही द्विधा मनस्थितीत असाल, ज्यामुळे तुम्हाला वेळेचा पूरेपूर फायदा घेता येणार नाही. अपुऱ्या भांडवळामुळे व्यवासिक योजनां पुढे ढकलाव्या लागू शकतात. 


सिंह (Leo) : हड्डी आणि किडनी संदर्भातील आजार असलेल्यासाठी अडचणीची वेळ आहे. ज्येष्ठ नागरिकांनी दुरचा प्रवास करु नये. कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेले मतभेद हे तुमच्या चिंतेचा विषय ठरेल. 


कन्या (Virgo) : संवाद कौशल्यामुळे तुम्ही सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवाल. यामुळे नवे उपक्रम हाती घेण्यासाठी ही योग्य वेळ आणि काळ आहे. अनेक उपक्रम यशस्वीपणे हाताळण्यासाठी तुम्ही सक्षण आहात.  


तुळ (Libra) : तुमच्या दांडग्या जनसंपर्कामुळे तुम्ही व्यवसायासंदर्भात महत्तवपूर्ण निर्णय घेऊ शकता. प्रयत्नांमध्ये चौफेर यश मिळवाल. कुटुंबाकडून सहकार्य लाभेल. 


वृश्चिक (Scorpio) : सर्वच कामात तुम्ही यशस्वी व्हाल. भाग्य तुमच्यासोबत आहे. नोकरदार वर्ग एखाद्या कामामुळे यश मिळू शकेल. परदेशी संपर्क असलेल्यांना अकस्मिक लाभ होईल.


धनु (Sagittarius) : मनातली गोष्ट कुटुंबियांना सांगाल. हुशारीच्या जोरावर कुटुंबियांकडून मदत प्राप्त कराल. श्रमिक आणि विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस शुभ नाही.


मकर (Capricorn) : संमिश्र दिवस राहिल. तुम्ही चिंतेत राहाल. विनाकारण अडचणीत फसाल, ज्यामुळे इतर कामांमध्ये त्याचा परिणाण होईल. आर्थिक समस्या सोडवण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. 


कुंभ (Aquarius) : आर्थिकरित्या संपन्न असाल. तुमची ख्याती वाढेल. समाजात सम्मान मिळेल. व्यापाराचा विस्तार होईल. मेहनतीचे फळ मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबियांसोबत चांगले संबंध राहतील.


मीन (Pisces) : व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी व्हाल. तुमचा नावलौकिक होईल. सुदृढ आरोग्यामुळे तुम्ही आनंदी रहाल. आत्मविश्वास वाढेल. कार्यालयात वरिष्ठ आणि सहकाऱ्यांना स्वत:कडे आकर्षित कराल.