मेष- एखाद्या गोष्टीप्रती मनी इच्छा बाळगून आहात, तर आज ती इच्छा पूर्ण होणार आहे. पण, चुकीच्या मार्गांचा मात्र वापर करु नका. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- आज स्वत:ला प्रेरित करा. जास्त मेहनत करावी लागू शकते.  ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करा. 


मिथुन- आज तुम्ही योग्य निर्णय घेण्यात यशस्वी ठराल. विचार सकारात्मक ठेवा. वेळ चांगला आहे. यशप्राप्तीच्या संधी आहेत. 


कर्क- अनेक नवी कामं तुमच्यावर सोपवण्यात येतील. वास्तवात फार आनंदी राहाल. धनलाभाचा योग आहे. 


सिंह- तुम्ही अनेक विचारांमध्ये गुंतलेले आहात. पण, चिंता करु नका. परिस्थिती तुमच्याच कलानं आहे. योग्य वेळेची प्रतीक्षा करा. चांगली वेळ दूर नाही. प्रयत्न करा. फार ताण घेऊ नका. 


कन्या- कोणतीही माहिती मिळाल्यास ती इतरांपर्यंतही पोहोचवा. इतरांनाही त्याचा फायदा होऊद्या. आज इतरांच्या मदतीनं निर्णय़ घ्या. 


तुळ - आज तणावमुक्त व्हाल. बऱ्याच काळानंतर जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळेल. 


वृश्चिक - आज लहानांचाही सल्ला घ्याल. नव्या विश्वाची झलक पाहण्याची संधी तुम्हाला मिळेल. नव्या कामांमध्ये मन रमेल. 


धनु- आज कोणतंही संकट ओढावू नका. अनपेक्षित व्यक्तीकडूनच मदत होणार आहे. पण, आश्चर्यचकित होऊ नका. 


मकर- आज इतरांना समजून घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही. अनेक अडचणी दूर होतील. दिवस आनंददायी आहे. 


 


कुंभ- दिवस आनंददायी आहे. मन शांत ठेवा. परिस्थिती तुमच्यासाठी फलदायी आहे. 


मीन- तुम्हाला चांगले संकेत मिळणार आहेत. इतरांवर आणि परिस्थितीवर विश्वास ठेवा. इतरांच्या हिताचा विचार करा.