मुंबई : शुक्रवारी सिंह राशीच्या लोकांना सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळणार आहे. दुसरीकडे, तूळ राशीच्या लोकांना हवामानाचा फटका बसण्याती शक्यता आहे. तर जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य कसं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष : शुक्रवारी तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा येईल. तसंच आज तुम्ही तुम्ही मांगलिक कार्यात सहभागी होऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नातेवाईक आणि मित्रांना भेटण्याची संधी मिळेल.


वृषभ : या शुक्रवारी मुलांची मदत तुमच्या आनंदात वाढ होणार आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून काही आनंदाची बातमी मिळेल.


मिथुन : शुक्रवारी तुमचं आरोग्य सामान्य राहील. तसंच तुमच्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल.


कर्क : या शुक्रवारी तुमचं आरोग्य चांगले राहणार आहे. तुम्हाला परदेश प्रवासाचा आनंद मिळण्याची शक्यता आहे. कामानिमित्त दूरचा प्रवास होऊ शकतो. तुमचा दिवस पैशांच्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे. याशिवाय तुम्ही पॉलिसी आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकता.


सिंह : शुक्रवारी भाग्य तुमच्यासोबत असणार आहे. त्याचप्रमाणे तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाईल.


कन्या : या शुक्रवारी तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्य साधारणपणे चांगलं राहील. तुम्ही दिलेला सल्ला इतरांना उपयोगी पडेल. याशिवाय पैशाची गुंतवणूक शुभ राहील.


तूळ: शुक्रवारी तुम्ही घराबाहेर फिरायला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, तुम्हाला आजच्या हवामानाचा फटका सहन करावा लागू शकतो. तर दुसरीकडे प्रत्येक कामात यश मिळेल.


वृश्चिक : या शुक्रवारी विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करणार आहेत. कोणालाही कर्ज देणं टाळा. आजच्या दिवशी पोटाशी संबंधित समस्या राहतील, खाण्यापिण्याची काळजी घ्या. नोकरीत कोणाच्या तरी मदतीमुळे काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल.


धनु : शुक्रवारी कामाच्या ठिकाणी अडचणी येण्याची शक्यता आहे. तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे खरे किंवा खोटे आरोप देखील लावले जाऊ शकतात. तसंच वादविवादापासून दूर राहणंच योग्य राहील. तुमचं भाग्य चांगलं राहणार आहे. 


मकर : या शुक्रवारी तुम्हाला नोकरीत चांगलं यश मिळेल. तुमचं प्रमोशन होण्याचीही शक्यता आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. याशिवाय कामात आर्थिक लाभ होईल.


कुंभ : शुक्रवारी नशीब तुमच्या सोबत आहे. कुटुंबाच्या बाजूने आनंदाची परिस्थिती राहील. 


मीन: या शुक्रवारी तुम्हाला सर्व कामात यश मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल. तुमच्या जोडीदारासोबत महत्त्वाच्या गोष्टी शेअर करा.