मेष- कामाच्या व्यापासोबतच जबाबदारी वाढेल. दिवसभर व्यग्र असाल. अचानक यशशिखरांवर पोहोचण्याची संधी आहे. बऱ्याच अंशी तुम्ही यशस्वी ठराल. एखाद्या कार्यक्रमाचा बेत लगेचच आखला जाऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- जुने वाद मिटतील. स्वत:ची काळजी घ्या. सक्रियता वाढेल. समाज आणि कुटुंबात तुमचा मान वाढेल. एखादी कल्पना डोक्यात घर करु शकते. खर्चावर ताबा ठेवा. 


मिथुन- धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस भरभराटीचा आहे. कुटुंबाला वेळ देण्यासाठी ही योग्य संधी आहे. एखादी शुभवार्ता मिळेल. 


कर्क- अचानक धनलाभ होईल. अडकलेले पैसेही परत मिळतील. मित्रांना मदत करण्यासाठी तयार राहा. कोणासोबत कोणताही वाद असल्यास तो मिटवण्याचा प्रयत्न करा. 


सिंह - आर्थिक परिस्थिती सुधारेल. काही मोठी आणि आवश्यक ते बदल घडतील. महत्त्वाकांक्षा वाढेल. मेहनत करा, समजुतदारपणे निर्णय़ घ्या. फायदा होईल. मनावरील दडपण कमी होईल. 


कन्या- नोकरी किंवा व्यवसायामध्ये एखादं नवं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. कामात नवे प्रयोग कराल. जोडीदारासमवेत काही बेत आखाल. कौटुंबीक सुख मिळेल. 


तुळ- विचाराधीन कामं पूर्ण होतील. आज अडकलेली कामं पूर्णत्वास नेण्यासाठी चांगला दिवस आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कर्जरुपी दिलेले पैसे परत मिळणार आहेत. 


वृश्चिक - तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. काही अशा गोष्टी समोर येऊ शकतात ज्यांचा तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. दिवस चांगला आणि भरभराटीचा आहे. 


धनु- नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी आजचा दिवस चांगला आहे. नव्या नोकरीमध्ये यश मिळेल. तुमच्या मदतीसाठी सर्वजण तयार असतील. 


 


मकर- एखादं महत्त्वपूर्ण काम करण्याला प्राधान्य द्या. जुनी कामं आवरण्याला प्राधान्य द्या. अविवाहितांसाठी प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. 


कुंभ- आज धैर्यानं काम करा. दिवसभर पैशांचा विचार करत राहाल. धनलाभ होण्याचा योग आहे. एखादं नवं काम पूर्णत्वास न्याल. प्रगतीचाच विचार मनात घर करुन असेल. आरोग्याची काळजी कमी होईल. 


मीन- आज जे कोणतं काम कराल त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. पैशांच्या बाबतीत अनेक विचार मनात येतील. ज्या आधारे तुम्ही तातडीनं एखादा निर्णय घ्याल.