Horoscope 31 January 2022 : `या` राशीच्या लोकांनी आरोग्याबाबत सावध राहावं
जाणून घ्या सोमवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.
मुंबई : सोमवारी सिंह राशीच्या लोकांना भाग्याची साथ लाभणार आहे. तर, तूळ राशीच्या लोकांचा दिवस पैसा आणि पैशासाठी खूप महत्त्वाचा असेल. ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे पुत्र चिराग दारुवाला यांच्याकडून जाणून घ्या सोमवारचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.
मेष (Aries)
सोमवारचा दिवस कामाच्या क्षेत्रात फायदेशीर ठरेल. व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहील. यासोबतच लोकांकडून आदरही मिळेल. नोकरीत वरिष्ठांकडूनही तुमची प्रशंसा होईल.
वृषभ (Taurus)
या सोमवारी तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सर्वांशी चांगलं वागाल. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांची वेळोवेळी मदत मिळेल. तुम्ही चांगले पैसे कमवू शकाल. कौटुंबिक सुख चांगलं राहील.
मिथुन (Gemini)
सोमवारी तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून कुटुंबातील सदस्यांसाठीही वेळ काढाल आणि त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल.
कर्क (Cancer)
सोमवारच्या दिवसाची सुरुवात आनंदाने होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरीत चांगले आर्थिक लाभ मिळतील. व्यापाऱ्यांना लाभाची परिस्थिती आहे.
सिंह (Leo)
सोमवारी तुम्हाला खूप नशिबाची साथ मिळणार आहे. नोकरीत प्रमोशनची शक्यता असून कार्यक्षेत्रात लाभ मिळेल. तसंच, कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होईल आणि तुम्ही त्यात सहभागी व्हाल.
कन्या (Virgo)
कार्यक्षेत्रात चांगलं यश मिळेल. तुमचा पैसा योग्य कामात खर्च होईल. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील पण मनात भीती राहील. या सोमवारी व्यापारी वर्गाला विशेष चांगले परिणाम मिळतील.
तूळ (Libra)
सोमवार हा पैसा आणि पैशासाठी खूप महत्त्वाचा असेल. पैशाशी संबंधित बाबी उत्तम राहतील. तुम्ही तुमच्या जुन्या मित्राशी संभाषण करू शकता. तसेच तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्ही उत्साहाने भरलेले दिसाल. नशीब तुमच्या सोबत आहे. याशिवाय कामात उत्साह दिसून येईल.
वृश्चिक (Scorpio)
या सोमवारी तुमची तब्येत बिघडू शकते. ज्यामुळे तुम्हाला दिवसभर अस्वस्थता जाणवेल. कामात कोणाचं तरी सहकार्य लाभेल. सोमवारी तुम्हाला खूप नशिबाची साथ मिळणार आहे.
धनु (Sagittarius)
तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही, पण कोर्टाशी संबंधित काही प्रकरणं असतील तर त्यामध्ये तुम्हाला थोडा दिलासा मिळेल. या सोमवारी तुम्ही हुशारीने काम कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल.
मकर (Capricorn)
तुमचा संपूर्ण दिवस उत्साहात जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. कामात चांगले पैसे मिळतील. तुमचा सोमवारचा दिवस चांगला जाईल.
कुंभ (Aquarius)
सोमवारी तुम्हाला अस्वस्थ वाटेल. तुमचे खराब आरोग्य तुमच्या अस्वस्थतेचं कारण असेल. विद्यार्थ्यांचं मन अभ्यासात लागणार नाही. नोकरी करणारे लोक नोकरीतील अडथळ्यांमुळे त्रस्त होतील.
मीन (Pisces)
तुम्हाला तुमच्या नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायासाठी सोमवारचा दिवस चांगला राहील. याशिवाय विद्यार्थी त्यांच्या क्षमता आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर यश मिळवतील.