राशीभविष्य ७ फेब्रुवारी : `या` पाच राशींच्या व्यक्तींची रखडलेली काम होणार पूर्ण
असा असेल आजचा दिवस
मुंबई : आजचा दिवस हा 12 राशींच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. दिवसाची सुरूवात ही चांगल्या कामांनी करा जेणे करून त्या चांगल्या विचारांचा परिणाम दिवसभर तुमच्यावर राहिल. पाहूया 12 राशींच महत्व
मेष - अनेक दिवसांपासून रखडलेली कामं आज पूर्ण होती. कौटुंबिक संबंध सुधारतील. आपली प्रतिमा बदलण्याची संधी आज मिळेल त्यामुळे आजच्या दिवसाचं सोनं करा. विवाहित लोकांसाठी आजचा दिवस खास आहे. आरोग्य उत्तम राहिलं. विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावं.
वृषभ - कामात व्यस्त असाल. खासगी आणि व्यावसायिक दृष्टीकोनातून आज सन्मान मिळू शकतो. मेहनतीने सगळं चित्र बदलू शकतं त्यामुळे व्यवसाय आणि नोकरीमध्ये मनापासून काम करा. शरिराकडे लक्ष द्या. कौटुंबिक वाद टाळा.
मिथुन - घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. पैशांची स्थिती थोडी चिंताजनक असेल. फालतू खर्च होऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायात थोडा तणाव जाणवेल. मित्रपरिवारासोबत आज दिवस घालवाल.
कर्क - नोकरीत थोडा त्रास जाणवेल. खासगी कामात थोडी जोखीम आढळेल. जास्त विचार करण्यात वेळ घालवू नका. अचानक डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर गोडवाच ठेवा. आरोग्य अस्वस्थता आढळेल.
सिंह - कुटुंबात सुख-शांती वाढेल. रखडलेली सर्व काम आज पूर्ण होती. सामाजिक क्षेत्रात तुमचं नावलौकिक होईल. जुन्या मित्रपरिवारासोबत गाठीभेटी वाढतील. जोडीदाराकडून आर्थिक मदत मिळेल.
कन्या - कामकाजात वाढ होईल. सहकाऱ्यांकडून आर्थिक मदत मिळेल. खूप दिवसांपासून जी काम रखडली होती त्या कामांना आज चांगली सुरूवात बोईल. कौटुंबिक स्वास्थ सांभाळा. विद्यार्थ्यांनी करिअरकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
तूळ - नोकरदार वर्गाकरता आजचा दिवस चांगला आहे. विशेष लाभ होणार आहे. अनेकांकडून आज तुम्हाला मदत मिळेल. कुणालाही आज दुखवू नका. कुटुंबातील मंडळींच स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे.
वृश्चिक - व्यवसायात कमी फायदा होऊ शकतो. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करू नका. आजचा दिवस थोडा खडतर असेल. त्यामुळे तणाव जाणवेल. अविवाहितांनी आज कोणताही महत्वाचा लग्नासंबंधीचा निर्णय घेऊ नका. आज थोडं शांतच राहा.
धनू - खूप दिवसांपासून ज्या कामापासून दूर होतात ती काम आज पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. विचारांमध्ये स्पष्टता ठेवा याचा खूप फायदा होईल. आगामी दिवसांची तरतूद आताच करून ठेवा. जोडीदाराकडून खूप चांगली साथ मिळेल. आरोग्यमध्ये चढ-उतार जाणवेल.
मकर - कोणतेही महत्वाचे आणि नवीन निर्णय घेऊ नका. पैसा अडकण्याची दाट शक्यता आहे. दिवसाची सुरूवात थोडी घाईगडबडीत होईल. पण आजच्या दिवशी थोडी शांतताच बाळगा. कुणालाही दुखवू नका. जोडीदारासोबत वेळ घालवा.
कुंभ - खूप दिवसांपासून ज्या गोष्टीची वाट पाहताय ते काम आज पूर्ण होणार आहे. आर्थिक तंगी असली तरीही तुम्ही सर्व गोष्टी सांभाळून घ्याल. चांगल्या लोकांची संगत धरा,आज त्याचा खूप फायदा होईल.
मीन- बिझनेस वाढवला नाही तरच चांगल आहे. सध्या तरी गाडी जशी सुरू आहे तशीच राहू द्या. महागड्या गोष्टींची खरेदी करू नका. आजच्या दिवसात महत्वाचं हेच होणार आहे की, रखडलेली काम पूर्ण होणार आहेत. त्यामुळे आज शांतच राहा.